विशेष प्रतिनिधी
साताऱा – कसले लॉकडाऊन… यांचे काळे कारनामे झाकण्यासाठी लॉकडाऊन… काय यांच्या बापाची इस्टेट आहे होय…; उदयनराजे संतापले!! साताऱ्यात भर दुपारी आज हे घडले. MP udayan raje bhonsle on bhik mango agitation in satara
महाराष्ट्रात परत लॉकडाऊन केले जाईल, ही शंका व्यक्त होताच उदयनराजे यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले. महाराष्ट्रात लॉक़ाऊन केले, तर जनतेमध्ये प्रचंड रोष उत्पन्न होईल. उद्योगधंदे, रोजगारावर त्याचा दुष्परिणाम होईल, असे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज हातात कटोरा घेऊन रस्त्यावर पथारी टाकून भीक मागो आंदोलन केले.
उदयनराजे भोसले हे झाडाखाली पोतं टाकून त्यावर बसले आणि भीक मागो आंदोलन केले. लॉकडाऊनबाबतचा रोष त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केला. राज्यातील ठाकरे – पवार सरकारवर त्यांनी यावेळी जोरदार टीकास्त्र सोडले.
लॉकडाउनमुळे संपूर्ण राज्यात बिकट परिस्थिती उद्भवली आहे. लोकांच्या रोजगारावर, उद्योगधंद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या सगळ्या परिस्थितीच्या निषेधार्थ खासदार उदयनराजे भोसले यांनी लॉकडाऊन विरोधात भीक मागो आंदोलन केले.@Chh_Udayanraje pic.twitter.com/jOozpWR3G1 — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 10, 2021
लॉकडाउनमुळे संपूर्ण राज्यात बिकट परिस्थिती उद्भवली आहे. लोकांच्या रोजगारावर, उद्योगधंद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या सगळ्या परिस्थितीच्या निषेधार्थ खासदार उदयनराजे भोसले यांनी लॉकडाऊन विरोधात भीक मागो आंदोलन केले.@Chh_Udayanraje pic.twitter.com/jOozpWR3G1
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 10, 2021
उदयन राजे म्हणाले, की महाराष्ट्रात काय बाजार मांडलाय काय या बाजारबुणग्यांनी… इथे ढिगाने पैसे खाताहेत आणि लसीकरण करता येत नाही त्यांना. लसीकरण झालेले कोरोना पॉझिटिव्ह होताहेत. शास्त्रज्ञांनी त्यावर बोलावे. या राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीच नाही. इच्छाशक्ती असेल, तरच सगळे काही होते. कसले लॉकडाऊन… यांचे काळे कारनामे झाकण्यासाठी लॉकडाऊन करताहेत हे… काय यांच्या बापाची इस्टेट आहे, होय…, अशा कडक शब्दांमध्ये उदयनराजे यांनी ठाकरे – पवार सरकारचा समाचार घेतला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App