युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केले आहे. उच्च न्यायालयाने त्यांना निकालावेळी दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. आपली खासदारकी वाचवण्यासाठी त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खा. नवनीत राणा यांनी यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. MP Navneet Rana Moves To Supreme Court After HC Verdict On Caste Certificate
विशेष प्रतिनिधी
मुंबई : युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केले आहे. उच्च न्यायालयाने त्यांना निकालावेळी दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. आपली खासदारकी वाचवण्यासाठी त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खा. नवनीत राणा यांनी यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खा. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेऊन याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. धनुका आणि न्या. बिश्ट यांच्या खंडपीठाने राणांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. एवढेच नव्हे, तर त्यांना 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
खा. नवनीत राणा यांनी लोकसभेमध्ये शिवसेना नेत्यांविरोधात कठोर भूमिका घेतली होती. खा. अरविंद सावंत आणि राणा यांच्यात खडाजंगीही उडाली होती. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.
MP Navneet Rana Moves To Supreme Court After HC Verdict On Caste Certificate
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more