फेब्रुवारी 2022 मध्ये राज्यातील 10 महापालिका, 20 नगर परिषदांच्या निवडणुकीची शक्यता

Elections for 10 Municipal Corporations and 20 Municipal Councils in the state likely to held in February 2022

Elections for 10 Municipal Corporations : मुंबई, पुण्यासह राज्यातील 10 महानगरपालिका आणि 20 नगर परिषदा, नगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्याची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुका एकसदस्यीस प्रभागरचना पद्धतीनं होणार असल्याची चर्चा सुरू आहे. Elections for 10 Municipal Corporations and 20 Municipal Councils in the state likely to held in February 2022


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई, पुण्यासह राज्यातील 10 महानगरपालिका आणि 20 नगर परिषदा, नगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्याची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुका एकसदस्यीस प्रभागरचना पद्धतीनं होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर आणि वसई विरार या महापालिकांसह 65 नगर पालिका आणि नगर परिषदांच्या प्रलंबित निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोगानं केली आहे. अर्थात, कोरोना महामारीची परिस्थिती लक्षात घेऊन याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

कोरोना संसर्गामुळे अनेक महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. राज्यात सध्या कोरोनाची लाट हळूहळू ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्याही कमी होत असून यामुळे पुन्हा एकदा प्रलंबित असलेल्या महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी करण्यात येत आहे.

दुसरीकडे, औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार आणि कोल्हापूर या महापालिकांच्या निवडणुका गतवर्षापासून लांबलेल्या आहेत. या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याची तयारी करण्यात येत आहे.

निवडणुकांबाबत निर्णय झाला, तर महापालिकांना 15 ऑगस्टपर्यंत प्रभागरचना अंतिम करावी लागणार आहे. सध्या लागू असलेल्या कायद्यानुसार राज्य सरकारने एकसदस्यीय प्रभाग निश्चित केलेला आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोध केला आहे. एकसदस्यीय प्रभागामुळे निवडणुकीत गैरप्रकार होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Elections for 10 Municipal Corporations and 20 Municipal Councils in the state likely to held in February 2022

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात