बुलेट ट्रेनसाठी मुंबई-हैदराबाद व्हाया औरंगाबाद, नांदेड, जालना मार्ग प्रस्तावित करा; अशोक चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Minister Ashok Chavan Letter To CM Thackeray For Mumbai Hayderabad Bullet Train Via Aurangabad Nanded Route

Bullet Train : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई-औरंगाबाद- जालना- नांदेड- हैदराबाद असा मार्ग केंद्र सरकारकडे प्रस्तावित करण्याची मागणी केली आहे. Minister Ashok Chavan Letter To CM Thackeray For Mumbai Hayderabad Bullet Train Via Aurangabad Nanded Route


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई-औरंगाबाद- जालना- नांदेड- हैदराबाद असा मार्ग केंद्र सरकारकडे प्रस्तावित करण्याची मागणी केली आहे. अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून या पत्रात त्यांनी सदरहू मार्गाची आवश्यकता व या प्रकल्पातील सुलभता निदर्शनास आणून दिली आहे.

देशभरात बुलेट ट्रेन प्रकल्पांच्या अंमलबजावणी करिता राष्ट्रीय स्तरावर नॅशनल हायस्पिड रेल कॉर्पोरेशनची स्थापना झालेली आहे. याअंतर्गत भविष्यात मुंबई ते नागपूर तसेच पुणे, सोलापूरमार्गे मुंबई ते हैदराबाद अशा मार्गांचे नियोजन करण्यात येणार आहे. तथापि, या नियोजनात मराठवाड्याला डावलण्यात आल्याची भावना आहे. यामुळे मुंबईहून हैदराबादला जाण्यासाठी औरंगाबाद, नांदेड हा मार्गसुद्धा उपलब्ध असल्याने या मार्गाचा समावेश करावा यासाठी अशोक चव्हाण यांनी पत्र दिले आहे.

मुंबई- औरंगाबाद- जालना- नांदेड- हैदराबाद असा दुसरा मार्गही केंद्र सरकारकडे प्रस्तावित करण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्रातून केली. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने समृद्धी महामार्गाला जोडणारा जालना- नांदेड द्रुतगती महामार्ग मंजूर केला असून त्यासाठी भू-संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी अधिसूचना काढण्याचा प्रस्ताव शासनास सादर झाला आहे.

या महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीतून मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाला जालना- नांदेडपर्यंत वाढवता येणे शक्य आहे. हाच मार्ग पुढे नांदेडवरून हैदराबादपर्यंत विस्तारित करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करता येणे शक्य आहे. यामुळे मुंबई ते हैदराबाद प्रवासासाठी पुणे-सोलापूर आणि औरंगाबाद-नांदेड असे दोन पर्यायी मार्ग उपलब्ध होतील.

Minister Ashok Chavan Letter To CM Thackeray For Mumbai Hayderabad Bullet Train Via Aurangabad Nanded Route

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात