विशेष प्रतिनिधी
पुणे : भोर येथून शिवज्योत आणण्यासाठी रायगडच्या दिशेने निघालेल्या तीन शिवप्रेमींची मोटारसायकल 200 फूट दरीत कोसळली. motorcycle 200 Feet fell into the valley
ही घटना पहाटे साडेतीनच्या सुमारा घडली. वरंध घाटात कावळे किल्ल्याजवळ अपघात झाला असल्याची प्राथमिकमाहिती मिळली आहे. अपघातामध्ये तिघेजण एकाच मोटारसायकलवर होते. गाडीवरील संयम सुटल्याने हा प्रकार घडला आहे.
केतन देसाई( 23) प्रथमेश गरुड (25) आणि किरण सुर्यवंशी (20) हे तरूण गाडीवरून पडल्यामुळे जखमी झाले आहेत.तिघांनाही महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे समजते.
आज महाराष्ट्रात सगळीकडे शिवजयंती अगदी मोठ्या उत्साहात सुरू आहे. पण अशा घटना घडत असल्यामुळे अनेक ठिकाणी शिवजयंतीच्या ठिकाणी दु:ख व्यक्त कऱण्यात येत आहे. कालपासून महाराष्ट्रात अशा अनेक दुर्देवी घटना घडल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App