पंडित नेहरू नंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार मोदी; राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरून ठेवले काँग्रेसच्या नसेवर बोट!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणारे नरेंद्र मोदी असा उल्लेख करून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत काँग्रेसच्या गांधी परिवाराच्या नसेवर बोट ठेवले. इतकेच नाही तर सैन्य घुसवून ओवैसींसारख्या देशद्रोह्यांचे अड्डे उध्वस्त करा अशी मागणी राज ठाकरे यांनी मोदींसमोर केली शिवाजी पार्कवर पंतप्रधान मोदींच्या अधी राज ठाकरे यांचे भाषण झाले. त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणे होऊन गेली होती. राज ठाकरे यांना मोदींच्या आधी भाषण करण्याचा मान महायुतीने दिला.Modi to become Prime Minister for the third consecutive time after Pandit Nehru; Raj Thackeray put his finger on the nerve of Congress from Shivaji Park!!



पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे मोदीजी… सन्मानिय व्यासपीठ आणि तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो…”, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. इथेच राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या नसेवर बोट ठेवले.

राज ठाकरे म्हणाले :

मोदीजी, तुम्ही अनेकदा मुंबईत आलात. पण २१ वर्षावर आपण शिवतीर्थावर आलात. मला आठवतंय त्यावेळी तुम्ही कमळातून बाहेर आला होता. आणि २०१४ ला आपण कमळ बाहेर काढलं. मी फार वेळ बोलणार नाही. मोदींचं भाषण ऐकायचं आहे. तीन टप्प्यात बोलणार आहे. एक टप्पा झाला आहे. पहिला टप्पा होता. मोदींची पाच वर्ष. त्यावर बोलायचं ते २०१९ मध्ये बोलून गेलो. आता गेली पाच वर्ष. मला वाटतं देवेंद्र फडणवीस, अजितदादा शिंदे सर्वांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर वेळ घालवला. जे सत्तेत येणार नाही. त्यांच्याबद्दल का बोलत नाही. काही आवश्यकता नाहीये त्यांची. अनेक योजना आहेत. ज्या पाच वर्षात झाल्या नाहीत. मी सभेत म्हटलं टिकेच्यावेळी टीका प्रशंसेच्या वेळी प्रशंसा!!

९० च्या दशकात आपल्या कारसेवकांना ठार मारलं. मुलायम सरकारने ते केलं. बाबरीचा ढाचा पडला. राम मंदिर कधी होईल असं वाटत होतं. मनात आलं हे मंदिर कधी होणार नाही. मोदींना धन्यवाद देतो. तुम्ही होता म्हणून राम मंदिर होऊ शकलं. नाही तर ते झालंच नसतं. जेव्हापासून मी पूर्वीचा इतिहास स्वातंत्र्यानंतरचा इतिहास बघतो तेव्हा एक गोष्ट कानावर पडायची. ३७० कलम रद्द झालं पाहिजे. इतक्या वर्षात ती गोष्ट झाली नाही. ती मोदींनी केली. काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही जागा घेऊ शकता. तो भारताचा भाग आहे हे आता सिद्ध झालं.

राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा मोठी केस झाली होती. प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं. शहाबानोच्या बाजूने कोर्टाने निकाल लावला. त्यानंतर राजीव गांधींनी बहुमताच्या आधारे निकाल काढून टाकला. त्या बाईला न्याय मिळाला होता. तो काढून टाकला. एका छोट्या पोटगीसाठी. पण मोदींनी ती गोष्ट करून दाखवली. त्यांनी ट्रिपल तलाक हा कायदा रद्द केला. देशातील सर्व मुस्लिम महिलांमध्ये समाधानाचे वातावरण झालं. रात्री नवरा आला शुद्धीत आला बेशुद्धीत आहे माहीत नाही. तलाक तलाक बोलला तर करायचं काय पुढे., पण मोदींनी कायदाच रद्द केला. याला धाडसी निर्णय म्हणतात. इतकी वर्ष जी गोष्ट झाली नाही. ती केली ही मोठी गोष्ट आहे. मोदीजी पुढच्या पाच वर्षासाठी मी तुमच्यापाठी उभा आहे. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. मला त्या बोलून दाखवायच्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले हे त्यांचे खरे स्मारक आहे ते गडकिल्ले पुन्हा उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक समिती स्थापन करून या गडकिल्ल्यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बनवा.

भारतात आजही अनेक ठिकाणी जिहादी लोक दबून बसलेत त्यांचे अड्डे सैन्य घुसवून उद्ध्वस्त करा.

Modi to become Prime Minister for the third consecutive time after Pandit Nehru; Raj Thackeray put his finger on the nerve of Congress from Shivaji Park!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात