बंगालमध्ये TMC नेत्यांच्या ठिकाणांवर CBIची छापेमारी!


निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराशी संबंधित आहे प्रकरण


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : सीबीआयने शुक्रवारी बंगालमधील दोन टीएमसी नेत्यांच्या घरावर छापे टाकले. २०२१ च्या निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा छापा टाकण्यात आला होता.CBI raids on places of TMC leaders in Bengal



सीबीआयने बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील काठी भागात टीएमसी नेत्यांच्या घरावर छापा टाकला. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात भाजपच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. सीबीआय अधिकाऱ्यांच्या पथकाने काठी ब्लॉक क्रमांक 3 येथील टीएमसी नेते देबब्रत पांडा यांच्या घरावर छापा टाकला. याशिवाय दुसऱ्या ब्लॉकमधील टीएमसी नेते नंदुलाल मैती यांच्या घरावरही कारवाई करण्यात आली.

सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, एफआयआरमध्ये पांडा आणि नंदुलाल यांच्या मुलासह अन्य ५२ आरोपींची नावे आहेत. या हिंसाचारात भाजप कार्यकर्ता जनमेजय दुलई यांचा मृत्यू झाला होता. सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. आरोपींचीही चौकशी केली जाणार आहे.

CBI raids on places of TMC leaders in Bengal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात