विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या प्रचारातील टीकेचा सगळा रोख उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर ठेवताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा वारंवार लावून धरला आहे.PM Modi targets rahul gandhi and sharad pawar over Savarkar’s insult issue
कल्याणच्या सभेत त्यांनी शरद पवारांना राहुल गांधींच्या तोंडून स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी पाच चांगली वाक्ये बोलवून घेण्याचे आव्हान दिले होते, तेच आव्हान त्यांनी आज शिवाजी पार्कच्या सभेमध्ये वेगळ्या पद्धतीने रिपीट केले. नकली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला मी आव्हान देतो, की त्यांनी राहुल गांधींकडून हे वदवूत घ्यावे की, ते सावरकरांचा कधीही अपमान करणार नाहीत. सध्या निवडणूक आहे म्हणून त्यांनी तोंडाला कुलूप घातले आहे. पण निवडणुका झाल्यानंतर ते पुन्हा सावरकरांचा अपमान करतील, असा इशाराही मोदींनी दिला.
शिवाजी पार्कच्या सभेआधी पंतप्रधान मोदींनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आले. तिथे त्यांनी सावरकरांना पुष्पांजली अर्पित केली. त्यानंतर ते शिवाजी पार्कच्या सभेला संबोधित करायला गेले आणि नंतर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन पुष्पांजली वाहिली.
शिवाजी पार्कच्या सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, नकली शिवसेनेचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. ज्या शिवाजी पार्क वरून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची वीरवाणी घुमली होती, त्या बाळासाहेबांचे पुत्र काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसल्याने सावरकर आणि बाळासाहेबांच्या आत्म्याला किती क्लेश होत असतील??, असा सवाल मोदींनी केला. त्याचवेळी शरद पवारांचे नाव न घेता, मोदी म्हणाले, मी नकली राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्याला आव्हान देतो, की त्यांनी राहुल गांधींकडून वदवून घ्यावे, की ते वीर सावरकरांचा कधीही अपमान करणार नाहीत. पण ते तसे करू शकणार नाहीत कारण निवडणुकीपुरते त्यांनी राहुल गांधींच्या तोंडाला कुलूप घातले आहे. निवडणुकीनंतर राहुल गांधी पुन्हा सावरकरांचा अपमान करायला सुरुवात करतील, असा इशाराही मोदींनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App