जुन्या संसदेचा निरोप घेताना मोदींचे सर्वसमावेशी भाषण; पंडित नेहरूंसह सर्व पंतप्रधानांचे मानले योगदान!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आज 18 सप्टेंबर 2023 ब्रिटिशांनी बांधलेल्या संसदेच्या कामकाजाचा शेवटचा दिवस… या जुन्या संसदेचा निरोप घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसमावेशी भाषण केले. एरवी काँग्रेसजन पंतप्रधान मोदी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचे नाव घेत नाहीत म्हणून आक्षेप घेतात. पण पंतप्रधान मोदींनी आजच्या भाषणात पंडित नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सर्व पंतप्रधानांची नावे घेत त्यांचे भारताच्या विकास यात्रेतले योगदान मनापासून मान्य केले. Modi’s Comprehensive Speech Farewell to the Old Parliament

गेल्या 75 वर्षांच्या इतिहासात भारतीय संसदेने घेतलेल्या सर्व ऐतिहासिक निर्णय यांचा उल्लेख केला. भारतीय जीवनात या संसदेने केलेल्या कामगिरीचा गौरव केला. लोकसभेच्या सभापतींपासून ते संसदेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या कामगिरीचा उल्लेख करून त्यांनी आभार मानले, इतकेच काय पण संसदेचे रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांचीही त्यांनी आठवण ठेवली.

पंतप्रधान मोदी कधीच पंडित नेहरूंचे नाव घेत नाहीत, असा आक्षेप काँग्रेस नेते नेहमी घेत असतात, तसेच मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत किंवा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत असे सांगितले जाते. पण जुन्या संसदेच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी मोदींनी आपल्या भाषणात पंडित नेहरूंचे नाव घेतले. त्यांचे ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे 15 ऑगस्ट 14 ऑगस्ट 1947 या दिवशीचे भाषण आठवले, त्याचबरोबर संसदेचे रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांचेही आभार मानले.

काँग्रेसच्या राजवटीत कधीच विरोधी पक्षांच्या सरकारांच्या कामगिरीचा उल्लेख केला जात नसे, पण ज्यांनी आयुष्य काँग्रेसमध्ये काढले पण विरोधी पक्षांचे नेतृत्व करून सरकारी चालवली त्या मोरारजी देसाई आणि विश्वनाथ प्रताप सिंह या पंतप्रधानांच्या योगदानाचीही मोदींनी आठवण काढली, इतकेच काय पण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी या दोन मंत्र्यांच्या कामगिरीची ही वाखाणणी केली. डॉ. आंबेडकरांनी देशाला संविधान दिलेच पण त्याचबरोबर पहिले जलधोरण दिले आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाला पहिले औद्योगिक धोरण दिले, याची आठवण मोदींनी आवर्जून सांगितली. त्याच औद्योगिक धोरणाच्या मार्गदर्शक प्रकाशात देशाची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले.

देश ज्यावेळी आर्थिक जुनाट धोरणांच्या कर्जमाफी रुतला होता, त्यावेळी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारने धाडसी निर्णय घेऊन देशाला आर्थिक सुधारणा धोरण दिले. आज त्याची उत्तम फळे देश चाखतो आहे हे मोदींनी आवर्जून सांगितले.

मोदींच्या आजच्या भाषणाचे वैशिष्ट्य सर्वसमावेशकत्व हेच ठरले. कारण कम्युनिस्ट खासदार इंद्रजीत गुप्ता यांच्यापासून ते सर्व प्रादेशिक पक्षांच्या खासदारांचे योगदानही मोठे असल्याचे ते म्हणाले. मोदींनी अटलजींच्या कामगिरीचा आढावा घेत असताना काँग्रेस खासदार अस्वस्थ राहिले. अटलजींनी देशाला सर्व शिक्षा अभियान दिले. अणूस्फोट घडवून देशाचे सामर्थ्य वाढविले, असे मोदी म्हणताच काँग्रेसच्या बाकावरून इंदिरा गांधींचे नाव प्रामुख्याने घेतले गेले. पण मोदींनी आपल्या भाषणात लालबहादूर शास्त्री यांच्या कामगिरीचा ही गौरवपूर्ण उल्लेख केला. 1965 च्या युद्धात त्यांचे नेतृत्व आणि देशाला हरितक्रांती देणारे नेतृत्व म्हणून शास्त्रीजींचा मोदींनी गौरव केला. चौधरी चरण सिंग यांच्या सरकारने ग्रामीण विकास मंत्रालय निर्माण केले. अटलजींच्या सरकारने आदिवासी विकास मंत्रालय निर्माण केले वेगवेगळी घटक राज्य निर्माण केली याची आठवण मोदींनी आवर्जून सांगितली.

काँग्रेसच्या राजवटीत विरोधकांचे योगदान स्वीकारण्याचे औदार्य क्वचितच दिसत असे, पण मोदींच्या आजच्या भाषणांमध्ये पंडित नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत प्रत्येक पंतप्रधानाच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख हे मोठे वैशिष्ट्य ठरले.

Modi’s Comprehensive Speech Farewell to the Old Parliament

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात