मार्को रुबियो मुंबईत दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गेटवे ऑफ इंडियावर केले स्वागत

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत केले. यावेळी फडणवीस यांनी पारंपरिक पद्धतीने शाल पांघरून रुबियो यांचा सन्मान केला. तसेच, मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची त्यांना माहिती दिली.



या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात संवाद झाला. त्यानंतर दोघांनी गेटवे ऑफ इंडिया परिसराची पाहणी केली. मुंबईच्या ऐतिहासिक महत्त्वाची आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख रुबियो यांना करून देण्यात आली.

या वेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेशचंद्र, राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच मार्को रुबियो यांच्यासोबत आलेले अमेरिकेचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

Marco Rubio arrives in Mumbai; Chief Minister Devendra Fadnavis welcomes him at the Gateway of India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात