जरांगे स्वतः निवडणुकीपासून लांब पण इतरांना उतरवणार मैदानात 127 जागांवरचा सर्व्हे पूर्ण!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडू, अशी दमबाजी करणारे मनोज जरांगे स्वतः मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपासून लांब राहणार असून ते इतरांना मैदानात उतरवणार आहेत. त्यासाठी त्यांचा 127 जागांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. manoj jarange news about vidhansabha election 2024

ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला १३ जुलैपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. विहित वेळेत जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आम्ही विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहोत, असे जाहीर करून 127 जागांवर पहिला सर्व्हे पूर्ण झाल्याचे जरांगे यांनी सांगितले. पण त्याचवेळी आपण स्वत: निवडणूक लढविणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने मनोज जरांगे यांनी ८ जूनपासून उपोषण सुरू केले होते. सरकारच्या शिष्टमंडळाने १३ जून रोजी आश्वासन देऊन एक महिन्याची मुदत मागितली. त्यानुसार जरांगे यांनी महिनाभराची वेळ देऊन उपोषण स्थगित केले आणि त्यानंतर प्रकृती स्वास्थ्यासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाले.

मनोज जरांगे यांनी ‘एपीबी माझा’ला विशेष मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केल्याचे स्पष्ट केले.

स्वत:चा पक्ष की उमेदवार अपक्ष??

मात्र निवडणूक लढवताना स्वत:चा पक्ष काढून उमेदवार उभे करणार की उमेदवारांना अपक्ष उभे करणार, याचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, वेळ पडली तर मराठा, मुस्लिम, दलित आणि लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढविणार, असे जरांगे म्हणाले.

मला किंवा मराठा समाजाला राजकारणात जायची अजिबात इच्छा नाही. परंतु सरकार आम्हाला राजकारण ढकलत आहे, त्याला आमचा नाईलाज आहे, असा दावा जरांगे यांनी केला.

manoj jarange news about vidhansabha election 2024

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात