उद्धव ठाकरेंनी जाहीर करताच यादी; काँग्रेस – शिवसेना – राष्ट्रवादीत पुरती बिघाडी!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी करताच जाहीर यादी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीत बिघाडी!! असे अपेक्षेवर हुकूमत घडले. फक्त सत्तेसाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीच्या तीन पक्षांचे तारू लोकसभेच्या जागा वाटपाच्या खडकावर फुटले. Major cracks in MVA over seat sharing in Mumbai and maharashtra

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केल्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून नाराजीचे सुरू उमटले. संजय निरुपम यांनी तर आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची आघाडी तोडा, असा काँग्रेसच्या हायकमांडला सल्ला दिला. शिवसेनेशी आघाडी करणे काँग्रेससाठी आत्मघातक होतेच, कारण त्यामुळे मुंबईतली काँग्रेस संपली. आता उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर करून काँग्रेस आणखी खड्ड्यात घातली. काँग्रेस हायकमांडने वेळीच हस्तक्षेप करून आघाडी तोडावी आणि काँग्रेस पक्ष वाचवावा, असे आवाहन संजय निरुपम यांनी केले.

त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी कोण संजय निरुपम त्यांना कोणी ओळखत नाही उद्धव ठाकरेंनी एकदा उमेदवार यादी जाहीर केली म्हणजे ती अंतिम आहे त्यात आता बदल होणार नाही अशा शब्दांमध्ये फटकारले त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचेच दिसून आले.

सांगलीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची हक्काची जागा आपल्याकडे खेचून घेतली आणि तिथे परस्पर चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली चंद्रहार पाटलांच्या समर्थकांनी फटाके फोडून तो आनंद साजरा केला पण त्याच दरम्यान विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांचे समर्थक दिल्लीत काँग्रेस हायकमांड कडे पोहोचले होते.

तिकडे मुंबईत ठाकरे गटाने संजय दिना पाटील यांचे उमेदवारी जाहीर केल्याबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी बिघडली. पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या कार्यालयात उद्धव ठाकरेंविरुद्ध जोरदार घोषणाबाजी झाली. महाविकास आघाडीतले नेते जागा वाटपाच्या वाटाघाटी तर करत होते, पण प्रत्यक्षात ते उमेदवारीचे आकडे जाहीर करत नव्हते आणि उमेदवारही जाहीर करत नव्हते, तोपर्यंत त्यांचे ऐक्य वरवर का होईना, पण टिकून राहिले होते. पण उद्धव ठाकरेंनी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि आघाडीचे तारू जागावाटपाच्या खडकावर फुटले.

Major cracks in MVA over seat sharing in Mumbai and maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात