विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसने कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळेला केलेले वायदे फसले. कारण ते सगळे राज्यांच्या एकूण बजेटच्या बाहेर गेले. दोन्ही राज्यांना अनेक योजना बंद कराव्या लागल्या आणि केंद्रातील मोदी सरकारकडे हात पसरावे लागले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा दिला होता. जेवढी झेपतील, तेवढीच आश्वासने द्या, त्या पलीकडे जाऊ नका. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळा, असे ते म्हणाले होते.
परंतु प्रत्यक्षात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल महाराष्ट्राच्या जनतेला ज्या 5 गॅरंटी दिल्या, त्याचा हिशेब लावला, तर त्या सगळ्या योजनांचा खर्च महाराष्ट्राच्या बजेटच्या निम्म्यापर्यंत येऊन पोहोचतो. म्हणजे तब्बल 3 लाख कोटींच्या खैराती योजना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल जाहीर केल्या. त्यावेळी स्वतः मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे उपस्थित होते.
Amit Shah : दहशतवादाविरोधातील उपाययोजनांवर दोन दिवस विचारमंथन सुरू राहणार
महाराष्ट्राचे बजेट 6:30 लाख कोटींचे असताना खैराती योजना 3 लाख कोटींच्या झाल्या. यात महिलांना दरमहा 3000 ₹, बेरोजगार युवकांना 4000 ₹, 25 लाखांचा कुटुंब वैद्यकीय विमा, शेतकऱ्यांची 3 लाखांची कर्जमाफी, कर्ज नियमित भरणाऱ्यांना 50000 ₹, मुलींप्रमाणे मुलांना पण मोफत शिक्षण, सगळ्या महिलांना एसटी बस प्रवास मोफत या खैराती योजनांचा समावेश आहे.
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेसह वेगवेगळ्या सर्व योजनांचा सगळा मिळून खर्च 75000 कोटींवर गेला. त्यावेळी काँग्रेसने त्याचबरोबर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची आर्थिक हालत खराब होईल, असा गळा काढला होता. पण त्यांच्याच महाविकास आघाडीने मात्र तब्बल 3 लाख कोटींच्या खैराती योजना काल जाहीर केल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App