पाच कोटी रुपयांची खंडणीही मागितली होती Salman Khan
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानसाठी मुंबई वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा संदेश पाठवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बिकाराम जलाराम बिश्नोई याला कर्नाटकातून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिकाराम जलाराम बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असून तो मूळचा राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील रहिवासी आहे. Salman Khan
सलमान खानला 4 नोव्हेंबरला आणखी एक धमकी मिळाली होती. त्याला धमकी देणाऱ्या व्यक्तीने त्याच्याकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली होती. तो तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा त्याने केला. याप्रकरणी कर्नाटकातील हुबळी येथे एका संशयिताला पकडण्यात आले. यानंतर मुंबई पोलिसांचे पथक तेथे पाठवण्यात आले. व्यवसायाने वेल्डर असलेल्या या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली. Salman Khan
Amit Shah : दहशतवादाविरोधातील उपाययोजनांवर दोन दिवस विचारमंथन सुरू राहणार
मुंबई पोलिसांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानविरोधात धमकीचा मेसेज आला होता. धमकीमध्ये सलमानाला दोन पर्याय देण्यात आले होते- जिवंत राहण्यासाठी माफी मागा किंवा 5 कोटी रुपये द्या. एका आठवड्यात सलमानला मिळालेली ही दुसरी धमकी होती.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला काल रात्री व्हॉट्सॲपवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचा संदेश आला. ट्रॅफिक कंट्रोल रूमला पाठवलेल्या मेसेजमध्ये तो लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा करण्यात आला होता. जर सलमान खानला जिवंत रहायचे असेल तर त्याला आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल किंवा 5 कोटी रुपये द्यावे लागतील. जर त्यांनी हे केले नाही तर आम्ही त्यांना मारून टाकू, आमची टोळी अजूनही सक्रिय आहे. असं मेसेजमध्ये होतं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App