कंगना राणावत विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पोलीसात तक्रार दाखल करणार; नाना पटोले यांची माहिती


वृत्तसंस्था

मुंबई : “भारताला स्वातंत्र्य भिकेत मिळाले. महात्मा गांधी यांचा क्रांतिकारक भगतसिंग यांच्या फाशीला पाठिंबा होता,” अशी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती मुंबई पोलिसांकडे एफआयआर दाखल करणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकारांना दिली आहे. Maharashtra Pradesh Congress will lodge a complaint against Kangana Ranaut with the police; Information of Nana Patole

कंगना राणावत हिने वादग्रस्त वक्तव्य करणे सोडलेले नाही. तिने इंडिया टुडेच्या मुलाखतीत भारताला भिकेमध्ये स्वातंत्र्य मिळाले, असे विधान केले होते. त्यानंतर तिने काल काही बातम्या आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत महात्मा गांधी यांचा क्रांतिकारक भगतसिंग यांच्या फाशीला देखील पाठिंबा होता, असे वक्तव्य केले आहे.

यावरूनच देशात गदारोळ उठला असून तिच्याविरोधात काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या दोन्ही नेत्यांनी तिच्यावर सडकून टीका केली आहे. सकाळी सकाळी त्या बाईचे नाव घेऊ नये, अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी कंगना राणावत हिच्यावर प्रहार केला आहे, तर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे.

Maharashtra Pradesh Congress will lodge a complaint against Kangana Ranaut with the police; Information of Nana Patole

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात