वृत्तसंस्था
पुणे : पुण्यातील सरकारी रुग्णालयाचा गैरकारभार उघडकीस आला आहे. काही डॉक्टरांनी उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांकडून एक लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे.Lakhs of rupees boiled by doctors in Pune; Government hospital mismanagement exposed
विशेष म्हणजे संबंधित रुग्णालय महापालिकेच्या अखत्यारीत आहे. याप्रकरणी पिंपरी ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तीन डॉक्टरांना अटक झाली आहे.
ऑटो क्लस्टर रुग्णालयात दाखल होणाऱ्याकडून एक रुपयाही आकारला जात नाही. परंतु 3 डॉक्टरांनी बेड मिळवून देण्यासाठी आणि दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये उकळले आहेत.
महापालिकेनं पिंपरी ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर डॉ. प्रवीण जाधव, डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे यांना अटक झाली. पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास बबनराव जगताप यांनी फिर्याद दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App