झिम्मा २’च्या सेटवर सायली अन् रिंकूने सिद्धार्थ चांदेकरसाठी बनवल्या होत्या भाकऱ्या !

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने सांगितल्या ‘झिम्मा २’च्या आठवणी!

विशेष प्रतिनिधी

पुणे : मराठी मनोरंजन विश्वात सध्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा पहिला भाग लॉकडाऊननंतर २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर सगळ्याच चाहत्यांच्या मनात ‘झिम्मा २’ केव्हा येणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर सात बायकांचं रियुनियन ‘झिम्मा २’च्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ चांदेकरने कलाकृती मीडियाशी संवाद साधला. Jimma movie news !

सिद्धार्थ चांदेकरला मुलाखतीत सेटवरची सगळ्यात सुंदर आणि लक्षात कायम लक्षात राहणारी आठवण कोणती? याबाबत विचारण्यात आलं. यावर अभिनेता म्हणाला, म्हणाला, “सायली आणि रिंकूने माझ्या वाढदिवसाला खास माझ्यासाठी भाकऱ्या बनवल्या होत्या. याचबरोबर सुहास मावशीने तिथे (परदेशात)थालीपीठं केली होती.”

आमच्या चित्रपटातील सगळ्या बायकांनी मिळून माझ्यासाठी खास ताट वाढून आणलं होतं. त्यादिवशी माझा वाढदिवस होता म्हणून तो प्रसंग…तो क्षण माझ्या कायम लक्षात राहील” असं सिद्धार्थ चांदेकरने सांगितलं. तो या ‘झिम्मा २’ चित्रपटात कबीर ही भूमिका साकारत आहे. येत्या २४ नोव्हेंबरला ‘झिम्मा २’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Jimma movie news !

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात