सामान्यांवर डाफरणाऱ्या अजितदादांच्या उपस्थितीत कोरोना नियमावलीची ऐशीतैशी, लग्नाला शेकडो लोक असूनही त्यांनी केले समर्थन


विशेष प्रतिनिधी

नाशिक : नियम हे केवळ सामान्यांसाठीच असतात. त्यामुळे पुण्यामध्ये दर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार सामान्य नागरिकांवर डाफरत असतात. परंतु, अजितदादांच्याच उपस्थितीत पार पडलेल्या एका लग्नात कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाले. शेकडो लोक या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.In the presence of Ajit Pawar hundreds of people violeted the Corona rules in marraige

अजित पवार गुरुवारी नाशिक दौऱ्या वर होते. एका लग्न सोहळ्यासाठी मुद्दामहून हा दौरा आयोजित करण्यात आला होता. नाशिकमध्ये आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या सिमंतिनी कोकाटे यांचा विवाह सोहळा होता. या लग्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यांच्या साक्षीनेच या लग्नाला कोरोना काळात घालून दिलेल्या सर्व नियमांचं उल्लंघन झाले.



कोरोना नियमावलीचे समर्थन करताना अजित पवार म्हणाले, समाजात वावरत असताना काही गोष्टी पाळायच्या असतात आणि काही नाती जपायची असता. कोरोना काळात कुणीही, कुठल्याही कारणासाठी गर्दी करणं चुकीचंच आहे, पण काही वेळा नाईलाज असतो. आपण जेव्हा लग्नाला गेलो होतो, त्यावेळी तिथल्या 100 टक्के उपस्थितांच्या चेहºयावर मास्क होते आणि कुणीही बेजबाबदारपणे वागत नव्हते.

सर्वसामान्यांच्या लग्नात सरकारनं नेमून दिलेल्या मयार्देपेक्षा अधिक व्यक्ती असतील, तर लगेच पोलीस कारवाई करतात. पण लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांच्या लग्नात तोच नियम पाळला जातो का, याबाबत अजित पवार यांना विचारले असता गर्दी करणं चुकीचं आहे. जी गोष्ट चूक आहे, तिला चूकच म्हटलं पाहिजे.

In the presence of Ajit Pawar hundreds of people violeted the Corona rules in marraige

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात