मलिक म्हणाले की , “अस सगळ्यांना वाटतंय की नवाब मलिक घाबरला आहे, पण असं ज्यांना वाटतं, ते चुकीच आहे.”Imprison all those who took lands in the name of God, Put everyone in jail “- Nawab Malik
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. पुण्यात एकूण 7 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत . या दरम्यान नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आज त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
नवाब मलिक म्हणाले की , “ज्यांनी ईश्वराच्या नावावर जमिनी घेतल्या, घोटाळा केला. त्या सगळ्यांना तुरुंगात टाका. ईडीने यात सहकार्य करावं” तसेच “भाजपाच्या माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडप केली. त्याचा देखील भांडाफोड करणार”. अस देखिल मलिक म्हणाले.
पुढे नवाब मलिक म्हणाले की , “अस सगळ्यांना वाटतंय की नवाब मलिक घाबरला आहे, पण असं ज्यांना वाटतं, ते चुकीच आहे. कारण नवाब मलिक घाबरणार नाही. तो शेवटपर्यंत लढाई घेऊन जाणार. ‘चोरोने हैं ललकारा मिलेगा करारा जबाब'”
“तुम्ही कोणाची प्रतिमा खराब करु शकत नाही. वरिष्ठांना खूष करण्यााठी खेळ खेळला जातोय. ईडी सहकार्य करत असेल, तर आम्ही स्वागत करतो. अस देखील मलिक म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App