बिन लायसन्सचा व्हॉल्वो ड्रायव्हर ते सायकल चोर मुख्यमंत्री; गुलाबराव पाटलांकडून ही शिवसेनेची स्तुती की ऐशीतैशी…!!??

विशेष प्रतिनिधी

पंढरपूर : उत्तर महाराष्ट्रातले शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील आपल्या राजकीय फटकळ वक्तव्यामुळे प्रसिद्ध आहेत. अशीच फटकळ वक्तव्ये त्यांनी आज पंढरपुरात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बिन लायसन्सचा व्होल्वो ड्रायव्हर म्हणून घेतले, तसेच नारायण राणे यांना सायकल चोर मुख्यमंत्री म्हणून देखील संबोधित करून टाकले. From unlicensed Volvo driver to bicycle thief CM; This is the praise of Shiv Sena from Gulabrao Patil or Aishita … !! ??

आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या कामगिरीची अफाट स्तुती करताना गुलाबराव पाटलांना जणू काही धरबंधच राहिला नव्हता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची स्तुती करताना ते म्हणाले, की शरद पवार साहेबांनी अशी काही जादू केली की ज्यांनी आत्तापर्यंत मोटर सायकल, छोटी गाडी, कार पण चालवली नव्हती त्याला एकदम व्होल्वो ड्रायव्हर बनवून टाकले. हा बिन लायसन्सचा ड्रायव्हर नीट गाडी चालवतोय का नाही याची आम्हाला शंका होती. पण अजित पवार कंडक्टर आणि बाळासाहेब थोरात प्रवासी अशी ही तिघांची गाडी जोरदार चालली आहे, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी महाविकास आघाडीची स्तुती केली. पण गुलाबराव पाटलांनी आपल्या नेत्यांची ही स्तुती केली की आपल्याच आघाडीची ऐशीतैशी करून टाकली, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



गुलाबराव पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी उद्धव ठाकरेंना बिन लायसन्सचा व्होल्वो ड्रायव्हर तर म्हणून घेतलेच शिवाय पिपाणी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले. पान टपरीवाला गुलाबराव पाटील मंत्री झाला. रिक्षाचालक दिलीप भोळे आमदार झाले. टोपली विकणारे चंद्रकांत खैरे खासदार झाले. हे शिवसेना नावाच्या अजब रसायनामुळे घडले, अशी मखलाशी देखील गुलाबराव पाटलांनी करून टाकली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज दसरा मेळाव्यात भाषण होणार आहे. त्याकडे सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांचे लक्ष आहे. त्याच्यावर सोशल मीडियात देखील भरपूर टीकाटिपणी सुरू आहे. असे असताना मध्येच गुलाबराव पाटलांनी पंढरपुरात अशी फटकळ फटकेबाजी करून स्वतःकडे लक्ष वेधून घेतले आहे. याचे शिवसेनेत काय पडसाद उमटतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

From unlicensed Volvo driver to bicycle thief CM; This is the praise of Shiv Sena from Gulabrao Patil or Aishita … !! ??

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात