विशेष प्रतिनिधी
मुरगूड : स्वत:ला मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचे अपहरण करून त्याचा बळी देण्याचा प्रकार कागल तालुक्यात उघडकीस आला आहे. हा नरबळीचा प्रकार असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.Frends son killed by man
सोनाळी (ता. कागल) येथे शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. वरद रवींद्र पाटील असे बळी गेलेल्या सात वर्षाच्या बालकाचे नांव आहे. त्याचे सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथून दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते.
याबाबतची तक्रार त्याचे वडील रवींद्र गणपती पाटील यांनी मुरगूड पोलिसात दिली. परंतू पोलिसांना वरदचा शोध घेण्यात अपयश आले, त्याचा मृतदेह सोनाळी (ता.कागल) येथील डोंगरात सापडला. महिलांनी प्रचंड संताप व्यक्त करत पोलिसांना घेराव घालून जाब विचारला.
वरद हा आपले आजोळ सावर्डे बुद्रुक येथे आजोबा दत्तात्रय शंकर म्हातुगडे यांच्या घरांच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी आई-वडिलांसोबत गेला होता. मंगळवार (दि. १७ ऑगष्ट) रात्री साडे आठच्या सुमारास तो बेपत्ता झाला.
रात्रभर व दुसऱ्या दिवशी सर्वत्र शोध घेवूनही त्याचा शोध लागला नाही. हे कृत्य कुण्या माहितीतील व्यक्तीचे असण्याची शक्यता व्यक्त झाली होती. वरदच्या वडलांच्या मित्रानेच हे केल्याचे उघडकीस आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App