प्रतिनिधी
नांदेड – मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी २३ वसतिगृहांचे उद्घाटन करण्याची घोषणा ठाकरे – पवार सरकारमधील काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. पण त्यावरून खासदार संभाजी राजे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. या वसतिगृहांपैकी बरीच वसतिगृहे मागच्या फडणवीस सरकारने बांधली आहेत. तुम्ही काय केलेत? फक्त उद्घाटने करणार…!!, अशा शेलक्या शब्दांमध्ये संभाजी राजे यांनी अशोक चव्हाणांचा समाचार घेतला.Rajya sabha MP Sambhaji Raje targets Ashok Chavan over Maratha reservation issue in his home town Nanded
खासदार संभाजी राजे नांदेडमध्ये मराठा आरक्षण मेळाव्यात बोलत होते. १४-१५ ऑगस्टला महाराष्ट्रात मराठा विद्यार्थ्यांसाठीच्या २३ वसतिगृहांचे उद्घाटन करणार असे अशोक चव्हाण म्हणाले होते. १५ ऑगस्टला शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या प्रयत्नातून वसतिगृह सुरू करून त्याचे उद्घाटन केले. पण या २३ वसतिगृहांपैकी बरीच वसतिगृहे तर मागच्या सरकारनेच बांधली आहेत.
नाशिक, कोल्हापूर, बीड, पुणे इथली वसतिगृहे मागच्या सरकारनेच बांधली आहेत. मग तुम्ही काय केले, असा खडा सवाल संभाजी राजे यांनी अशोक चव्हाणांना केला. तुम्ही काही केले नाही, म्हणून तुम्ही नांदेडच्या मराठा आरक्षण मेळाव्यात आला नाहीत, असे आम्ही समजायचं का?, असे टीकास्त्रही संभाजी राजे यांनी सोडले.
संभाजी राजे म्हणाले, की मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मला १५ पानी पत्र पाठविले आहे. पण या पत्रात अनेक तफावती आहेत. पहिले मूक आंदोलन कोल्हापूरला झाले, दुसरे नाशिकला झाले. त्या मूक आंदोलनाला सगळे मंत्री, आमदार, खासदार आले होते.
नाशिकच्या आंदोलनालाही ओबीसी समाजाचे मंत्री छगन भुजबळ आले होते. आजही खासदार-आमदार आलेत. मग तुमचे पालकमंत्री कुठे आहेत? तुम्हाला जर प्रामाणिकपणे हे पत्र द्यायचे होते, तर पालकमंत्र्यांच्या हातून ते द्यायचे होते. अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आम्ही हे पत्र स्वीकारत नाही, असे संभाजी राजे जाहीर केले.
मला हे पत्र पटतच नाही. १५ जुलैला सरकारचा एक जीआर निघाला. राज्य सरकारने सांगितले की ज्यांना २०१४ पासून कोविडच्या संकटापर्यंत ज्यांना नियुक्त्या दिल्या आहेत, त्यांना रुजू करून घ्या. समाजाचे लोक खूश झाले. पण हेच लोक अधिकाऱ्यांकडे गेले, की ते म्हणतात, तुमचे आरक्षण रद्द झाले आहे. मग तुम्हाला नोकरी कशी द्यायची. मग हा जीआर काढून काय फायदा? राज्य सरकार झोपा काढतेय का? त्या जीआरचा काय फायदा?, असा सवालही संभाजीराजे भोसले यांनी केला.
ज्या उमेदवारांची निवड झाली आहे, त्यांना अजून नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. त्या मुलांवर अन्याय होतोय. या पत्रात मुख्यमंत्र्यांना त्यावर काहीही लिहिलेले नाही. या सगळ्यात गरीब मराठ्यांची काय चूक आहे?, असा बोचरा सवाल संभाजीराजे यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App