महिला आणि समाजाच्या रक्षणासाठी असदुद्दीन ओवैसी यांना अफगाणिस्तानात पाठवून द्या; केंद्रीय मंत्री शोभा करंदलजे यांचा हल्लाबोल


वृत्तसंस्था

बंगळूर : एआयएमआयएम पक्षाचे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना अफगाणिस्तानात पाठवून द्या. तिथल्या महिला आणि समाजाच्या रक्षणासाठी त्यांची गरज आहे, असा प्रखर हल्लाबोल केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलजे यांनी आज केला. Owaisi to Afghanistan to protect their women and their community: Union Minister Shobha Karandlaje

असदुद्दीन ओवैसी यांनी आणि त्यांच्या एआयएमआयएम पक्षाने अफगाणिस्तानातल्या तालिबानी राजवटीचे समर्थन केले आहे. अनेक भारतीय मुस्लिम संघटनांनी तालिबानच्या दहशतवाद्यांची तुलना स्वातंत्रयोद्ध्यांशी केली आहे. या पार्श्वभूमीवर शोभा करंदलज यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

त्या म्हणाल्या, की भारतासारख्या सुरक्षित धर्मनिरपेक्ष देशात राहून असदुद्दीन ओवैसींसारखे नेते भारतीयांना सहिष्णुतेचा उपदेश करत असतात. आता त्यांनी धार्मिक सहिष्णूता आणि सुरक्षितता अफगाणिस्तानात जाऊन शोधावी. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी महिलांवर आणि मुलांवर जी बंधने लादली आहेत ती बंधने त्यांच्यासारख्या नेत्यांनी तिथे जाऊन दूर करून दाखवावीत.

तिथे ज्या प्रकारे तालिबान्यांची क्रूर राजवट सुरू झाली आहे ते पाहता भारतात आपण किती सुरक्षित आहोत हे त्यांच्या लक्षात येईल, असा टोलाही शोभा करंदलजे यांनी ओवैसी आणि अन्य भारतीय मुस्लिम नेत्यांना लगावला.

केवळ ओवैसी यांनीच नव्हे, तर समाजवादी पक्षाचे खासदार शफिक उर रहमान बर्क, प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी देखील तालिबानी राजवटीचे समर्थन केले आहे. गेली २० वर्षे अफगाणिस्थान अमेरिकेच्या पारतंत्र्यात होता.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे, अशी मुक्ताफळे मुनव्वर राणा यांनी उधळली आहेत. या राजकीय पार्श्वभूमीवर शोभा करंदलजे यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्यावर प्रखर हल्लाबोल करण्याच्या निमित्ताने तालिबानी समर्थक सर्व नेत्यांनाही ठणकावून घेतले आहे.

Owaisi to Afghanistan to protect their women and their community: Union Minister Shobha Karandlaje

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात