बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ शुद्ध करणारे तालिबानी विचारांचे ; देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेला टोला


विशेष प्रतिनिधी

नागपूर : बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ शिवसैनिकांनी गोमूत्र आणि दुधाने स्वच्छ केलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दर्शन घेतल्यानंतर स्मृतीस्थळ अपवित्र झाल्याचं सांगत ही कृती करण्यात आली. त्याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनीही कडाडून टीका केली आहे.

बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ शुद्ध करणारे बुरसटलेल्या तालिबानी विचारांचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये म्हटलं आहे.ज्यांनी हे कृत्य केले असेल त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीत ही संकुचित मानसिकता त्यांनी दाखवून दिली आहे.

बुरसटलेले तालिबानी विचार घेऊन ही कृती करण्यात आली आहे. ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचे पुरेपूर प्रयत्न केले त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत हे लोक बसले आहेत. नारायण राणे यांनी समाधीस्थळाचं दर्शन आणि बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे स्मृतीस्थळ अपिवत्र झालं ही बुरसटलेली मानसिकता आहे ,असे मला वाटतं.

  •  नारायण राणे यांचे स्मृतिस्थळी वंदन खटकले
  •  स्मृतीस्थळ अपिवत्र झालं ही बुरसटलेली मानसिकता
  •  शिवसेनेकडून गोमूत्र, दुधाने स्वच्छता
  •  स्मृतीस्थळ शुद्ध करणे म्हणजे तालिबानी विचार
  •  बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्यां बरोबर आता मांडीला मांडी

After visit of Narayan Raane at Balasaheb’s memorial the shivasena washed the place with milk and cow urine. This is a Taliban ideology : Fadanvis

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात