विशेष प्रतिनिधी
सांगली : सरकारच्या आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी वाक्षेवाडी पठारावर बैलगाडा शर्यत पार पाडली आहे. कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होऊ देणार नाही नाही,Bullock cart race at last arranged in Sangali District!; Padalkar Deceived the government
असा चंग शासन आणि प्रशासानाने बांधला होता. तर काहीही झालं तरी शर्यत पार पडणारच, असा निर्धार पडळकर यांनी बोलून दाखवला होता. अखेर आज सकाळी पहाटे पाच वाजता पडळकर समर्थकांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करुन शासन आणि प्रशासनाला कात्रजचा घाट दाखवला.
पोलिसांचा मोठा फौजफाटा, मात्र पडळकर आणि समर्थकांनी गुंगारा देऊन बैलगाडा शर्यत भरवलीच!गोपीचंद पडळकर आयोजित बैलगाडा शर्यतीला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सांगलीच्या झरे गावात आणि सगळ्या पंचक्रोशीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे बैलगाडा शर्यत होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र पडळकर समर्थकांनी मोठ्या शिताफीने पोलिसांना आणि प्रशासनाला गुंगारा दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App