अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील कलाकार मंडळीही प्रभावित झाली आहेत. येथील एक अभिनेता आता भूमिगत झाला आहे. कारण नुकतेच तालिबान्यांनी त्याचे घर फोडले. भूमिगत होण्यापूर्वी या अभिनेत्याने दिग्दर्शक कबीर खान यांना भारतीय व्हिसा मिळण्यासाठी विनंती केली होती. ही माहिती काबूल एक्स्प्रेसचे दिग्दर्शक कबीर खान यांनी दिली. ‘द क्विंट’ला त्यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत सविस्तर मुलाखत दिली आहे. Afghanistan Crisis Director Kabir Khan Says Taliban ransacked house of actor part of Kabul Express, he is underground now
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील कलाकार मंडळीही प्रभावित झाली आहेत. येथील एक अभिनेता आता भूमिगत झाला आहे. कारण नुकतेच तालिबान्यांनी त्याचे घर फोडले. भूमिगत होण्यापूर्वी या अभिनेत्याने दिग्दर्शक कबीर खान यांना भारतीय व्हिसा मिळण्यासाठी विनंती केली होती. ही माहिती काबूल एक्स्प्रेसचे दिग्दर्शक कबीर खान यांनी दिली. ‘द क्विंट’ला त्यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत सविस्तर मुलाखत दिली आहे.
कबीर खान हे काही मोजक्या चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत ज्यांनी अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. 2006 मध्ये त्यांची पहिली फीचर फिल्म ‘काबुल एक्स्प्रेस’ व्यतिरिक्त त्यांनी तेथे काही डॉक्युमेंटरी फिल्मचे शूटिंगदेखील केले आहे. ज्यामध्ये पोस्ट-9/11 चाही समावेश आहे. यात देशावरील तालिबानची पाच वर्षे दर्शवण्यात आली होती.
बजरंगी भाईजान, न्यूयॉर्क आणि एक था टायगरचे दिग्दर्शन करणारे चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यांनी सांगितले की, त्यांना अफगाणिस्तानमधील क्रिएटिव्ह कम्युनिटीबद्दल काळजी वाटतेय. भारत सरकारचे अफगाण निर्वासितांबद्दल चांगले धोरण आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कॉमेडियन नजर मोहम्मदची तालिबान्यांनी हत्या केली. तेथील चित्रपट निर्मात्या सारा करिमी यांनी जाहीर आवाहन केले आहे. यात त्यांनी इतर देशांतील चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या सरकारांवर अफगाणिस्तानच्या लोकांना मदत करण्यासाठी दबाव आणण्याची विनंती केली आहे. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर तिथल्या क्रिएटिव्ह कम्युनिटीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
Afghanistan Crisis Director Kabir Khan Says Taliban ransacked house of actor part of Kabul Express, he is underground now
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App