‘हनीट्रॅप’द्वारे तरुणास 20 लाख रुपयांना लुटले, इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तरुणीने शरीरसंबंध करण्यास पाडले भाग


विशेष प्रतिनिधी

पुणे : इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तरुणीने शरीरसंबंध करण्यास भाग पाडत तरुणाला 30 लाख रुपयांना लुबाडण्यात आले. पोलिसांनी तरुणी तिचा भाऊ यांच्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.Honeytrap robs young man of Rs 20 lakh,

काही दिवसांपूर्वी पनवेल येथील बांधकाम व्यावसायिकाला इंस्टाग्रामवरून झालेल्या ओळखीतून पुण्यात बोलवून ‘हनीट्रॅप’द्वारे लुटणाऱ्या टोळीविरुद्ध आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने २० वर्षाच्या तरुणांकडून तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी वसूल केली आहे.



लोणी काळभोर पोलिसांनी एका तरुणीसह तौफिक शेख, मंगेश कानकाटे, शुभम कानकाटे, साईराज कानकाटे, ऋतुराज कांचन, बंटी आमले, प्रतिक लांडगे आणि तरुणीच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलिसांनी या तरुणीसह साथीदारांना यापूर्वी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा मांजरी येथे राहतो. या तरुणाची संबंधित तरुणीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या तरुणीने 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान तक्रारदार तरुणाला भेटायला बोलावले. ऋतुराज कांचन यांनी भेटण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणावर हे दोघे भेटले. त्यावेळी या तरुणीने त्याला जबरदस्तीने शरीर संबंध करण्यास भाग पाडले.

त्यानंतर आरोपींनी त्या ठिकाणी जाऊन तरुणाला मारहाण करीत खिशातील तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच त्याला गाडीत घालून यवत पोलीस ठाण्यासमोर नेले. बलात्काराचा गुन्हा दाखवण्याची दाखल करण्याची भीती घालत ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली.

तडजोडी अंती आरोपींनी २० लाख रुपये या तरुणाकडून वसूल केले. समाजात बदनामी होण्याच्या भीतीने या तरुणाने कुठेही तक्रार दिली नव्हती. मात्र, कोंढवा पोलिसांनी या टोळीला अटक केल्याचे समजताच त्याने पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली आहे.

Honeytrap robs young man of Rs 20 lakh,

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात