सांगलीच्या पूरपट्टयात स्वच्छतेला गती ५० वाहने, १५० कर्मचारी स्वच्छतेसाठी उतरले


विशेष प्रतिनिधी

सांगली : सांगलीत महापूर ओसरल्यानंतर पूर पट्ट्यात स्वच्छतेला सांगली महापालिकेने गती दिली आहे. महापालिकेच्या मदतीला बृहन्मुंबई, पुणे, पिंपरी, मुंबई , सोलापूर या चार महापालिकेच्या टीमसुद्धा आल्या असून ५० हून अधिक वाहने आणि १५० कर्मचारी सांगलीच्या स्वच्छतेसाठी उतरले आहेत.Accelerate cleanliness in Sangli floodplain

सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी ५५ फुटावर गेल्यानंतर निम्मे शहर जलमय झाले होते. सोमवारपासून पुराचे पाणी ओसरण्यास सुरवात झाल्यानंतर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नियोजनानुसार महापालिकेकडून स्वच्छता औषध आणि धूर फवारणी हाती घेण्यात आली आहे.



याचबरोबर पाणी ओसरल्यावर निर्माण झालेला राडारोडा उचलून रस्ते स्वच्छ करण्याचे कामही गतीने हाती घेण्यात आले आहे. यासाठी सांगली महापालिकेचे आरोग्य कर्मचारी स्वच्छता करत आहेतच शिवाय पुणे, मुंबई, सोलापूर, पिंपरी या महापालिकांच्या टीमची स्वच्छतेसाठी दाखल होत स्वच्छता सुरू केली आहे.

सांगली शहर, सांगली वाडी,मिरजेच्या कृष्णा घाट परिसरात सुद्धा स्वच्छतेसाठी अन्य महापालिकांचे कर्मचारी काम करत आहेत. यासह अन्य महापलिकांची टीमही सांगलीत येत असून शहरातील रस्ते चिखलमुक्त आणि कचरामुक्त करण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.

  •  मुंबई, पुणे, पिंपरी, मुंबई , सोलापूर पालिकेची स्वच्छता मोहीम
  •  ५० वाहने आणि १५० कर्मचारी पथक दाखल
  • औषध आणि धूर फवारणी हाती घेण्यात आली
  • कृष्णा घाट परिसरात सुद्धा स्वच्छता सुरु
  • चिखल, राडारोडा, माती काढण्याचे काम वेगात

Accelerate cleanliness in Sangli floodplain

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात