विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत महाविकास आघाडीतील नेत्यांचा जो पर्दाफाश केला आहे, त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात जोरदार उमटले आहेत. Fadanavis – Pawar: The eye of the great lord and the third eye of Lord Shiva; Maharashtra BJP’s suggestive tweet !!
या व्हिडिओ मध्ये थेट मोठ्या साहेबांचे नाव असल्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात भाजपने महाराष्ट्र भाजपने देखील एक सूचक ट्विट केले आहे. मोठ्या साहेबांची नजर सगळीकडे असली तरी शंकराने तिसरा डोळा उघडला आहे, असे भाजपचे ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे. आज तर फक्त व्हिडिओचा पहिला भाग जारी झाला आहे. अजून बरेच भाग जारी होणार आहेत, असेही भाजपने स्पष्ट केले आहे.
मोठे साहेब, नेहमीच अदृश्य हाताने कटकारस्थान करण्यात माहीर असतात. पण, यावेळी ते अदृश्य हात ही जनतेला योग्य वेळी दाखवू! मोठ्या साहेबांचा पोपट मिठू मिठू बोलत होता, मोठ्या साहेबांची नजर असते. पण, त्या पोपटाला माहिती नाही की, शंकराचा तिसरा डोळाही उघडला आहे.
भाजप नेत्यांना कोणत्या घोटाळ्यात कसे अडकवायचे?, अशा स्वरूपाचे कटकारस्थान असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली. यामध्ये फडणवीसांनी जवळजवळ 125 तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग – ऑडिओ रेकॉर्डिंग विधानसभा अध्यक्षांना सादर केले आहे. या एकूणच कटकारस्थाना संदर्भात सीबीआय चौकशी करावी. अन्यथा मला कोर्टात जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे ठाकरे – पवार सरकारमधील प्रमुख मंत्र्यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्र भाजपातील प्रमुख नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवाचये आणि त्यांना अटक करायचे, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुंगटीवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, चंद्रकांत बावनकुळे यांना टार्गेट करायचे, अशा प्रकारचे टूलकीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी विधानसभेत उघड केले.
यामध्ये सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी यासाठी खोटे गुन्हे दाखल करणे, खोटे पंचनामे तयार करणे यासाठीच प्लनिंग वकील चव्हाण करत आहे, तसे व्हिडिओ पुरावे म्हणून त्या पेनड्राइव्हमध्ये टाकून तो विधानसभा अध्यक्षांनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App