‘आयटी’ छाप्याविषयी खरमाटेंना आधीच कुणकुण? छाप्यात ठाकरे, परबांचे विश्वासू लोक


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थानांवर आयकर विभाग (आयटी) छापे टाकत आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन अनिल परब यांच्याशी ते संबंधित आहेत. मुंबई आणि पुण्यात छापे टाकण्यात येत आहेत. पुण्यातील आरटीओ कार्यालयातील अधिकारी बजरंग खरमाटे यांचाही त्यात समावेश आहे. खरमाटे यांना छापा पडण्याची कुणकुण आधीच लागली होती, असे सांगितले जात आहे. Already Kharmade have a suspect of the ‘IT’ raid ?

बजरंग खरमाटे नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी होते. सध्या ते पुण्यातील आरटीओ कार्यालयात असून परिवहन मंत्री अनिल परब यांचे जवळचे मानले जातात. अनिल परब आणि बजरंग खरमाटे यांनी संगनमताने करोडो रुपये जमवले आणि आपसात वाटून घेतले,



असा आरोप भाजप नेते किरिट सोमैय्या यांनी केला होता. त्यांनी दोन-दोन महिन्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आणि 25-30 लाख रुपयांपासून एक कोटी रुपये घेऊन प्रमोशन केले असल्याचेही सोमैय्या यांनी आपल्या आरोपात म्हटले होते. आज खरमाटे यांच्या घरावरही आयटीने छापेमारी केली.

दरम्यान, खरमाटे यांना रेड होण्याची कुणकुण आधीच लागली होती. घाई गडबडीत बजरंग खरमाटे यांनी त्यांचे सख्खे भाऊ साहेबराव काकासाहेब खरमाटे यांच्या नावावर असलेली बारामती रुई येथील NA जमीन फ्लॉट, गट क्रमांक 114/1/1/1/2 पाच दिवसापूर्वी 3/3/2022रोजी विकली आहे. विशेष म्हणजे एका दिवशी 31 खरेदीखते करण्यात आली आहेत.

महाविकास आघाडीची भाजपाला भीती

प्राप्तीकर विभागाने आज सकाळीच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल आणि संजय कदम यांच्या मुंबईतील घरांवर छापे टाकले. या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे  म्हणाले “महाराष्ट्रावर आधीही अशी आक्रमणे  झाली आहेत. हे दिल्लीचे आक्रमणच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा इथे निवडणुका लागतील असे  समजले  आणि महाविकास आघाडीची भाजपाला भीती वाटायला लागली. तेव्हापासून हे सुरू आहे.”

Already Kharmade have a suspect of the ‘IT’ raid ?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात