ईव्हीएमवर आरोप केले म्हणजेच अखिलेश यादव यांनी पराभव केला मान्य


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज अखेर ईव्हीएमवर आरोप केला असून पराभव मान्य केल्याचे मानले जात आहे. या भागात भाजपचा पराभव होताना दिसत आहे त्या जिल्ह्यातील डीएमला मुख्यमंत्री आणि प्रमुख सचिव फोन करत आहे, आणि मतमोजणी धिम्या गतीने करा असे सांगत आहे. असा आरोप खुलासा अखिलेश यादव यांनी केला आहे.Allegations against EVM mean defeat by Akhilesh Yadav

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीचे निकाल येत्या 10 मार्चला समोर येणार आहे. त्यापूर्वी समाजवादी पाटीर्चे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी इव्हीएम मशीनांची हेराफेरी सुरू असल्याचा आरोप केला आहे.

अखिलेश म्हणाले की, बनारसमध्ये ईव्हीएमने भरलेला एक ट्रक पकडण्यात आला असून, दुसरा एक ट्रक फरार झाला आहे. तर बरेली येथे कचºयाच्या गाडीत तीन बॉक्स भरुन बॅलेट पेपर्स मिळाले आहे. सोनभद्र येथे देखील एश्ट मध्ये हेराफेरी झाली असून, सरकारी मतदानाची चोरी करत असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला आहे.



बनारसमध्ये विना परवानगी ईव्हीएमची हेराफेरी होत असल्याचे अखिलेश यादव म्हणाले. भाजपचे नाव न घेता ते म्हणाले की, सपा सरकारच्या काळात बनवलेले बंगले आणि उद्यानांची स्वच्छता होत असल्याचे पाहून हे लोक घाबरले. त्याचवेळी एक्झिट पोलवर अखिलेश म्हणाले की, मला याबाबत काहीही बोलायचे नाही. एक्झिट पोल हे काल आले आहेत. जनतेची दिशाभूल करुन मतचोरी केली जात असल्याचा आरोप अखिलेश यांनी भाजपवर केला आहे.

उत्तर प्रदेशची लढाई ही लोकशाहीची शेवटची लढाई असल्याचे अखिलेश म्हणाले. ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी आहे. कारण, यानंतर पुन्हा परिवर्तनासाठी क्रांती करावी लागणार आहे. स्वातंत्र्यासाठी जशी लढाई लढावी लागते, तशीच लढाई पुन्हा लढावी लागेल. अखिलेश यादव यांनी जनतेला आवाहन केले आहे की, तुम्ही ज्या पद्धतीने मतदान केले, त्यापद्धतीने आपले मत सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी देखील तुमच्यावर आहे. असे म्हणत अलिखेश यादव यांनी मतमोजणीवर नजर ठेवण्यास सांगितले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सचिव जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन, ज्या ठिकाणी भाजपचा पराभव होत आहे. त्याठिकाणी मतमोजणी संथ गतीने करा. जेणेकरुन एश्ट मध्ये हेराफेरी केली जाऊ शकेल. असे सांगत आहे. जिल्हाधिकारी हे सरकारसाठी काम करत आहे. असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

अखिलेश म्हणाले की, बॅलेट पेपर पकडण्यात आले आहे. सोनभद्र आणि बरेली येथे सर्रासपणे एश्ट ची हेराफेरी केली जात आहे. त्यावर निवडणूक आयोग गप्प बसले आहे. आता हे लोकं मतमोजणी दरम्यान नेटवर्क जॅमरची मागणी करत आहे. जेणेकरुन एश्ट मध्ये छेडछाड केली जाऊ शकेल.

अखिलेश यादव यांनी केलेल्या आरोपांवर, एसीएस नवनीत सहगल यांनी सांगितले की, वाराणसीमध्ये प्रशिक्षणासाठी, ईव्हीएम मंडीतील एका वेगळ्या गोदामातून यूपी कॉलेजमध्ये नेले जात होते. काही राजकीय लोकांनी हे वाहन थांबवून निवडणुकीत वापरलेले ईव्हीएम म्हणत अफवा पसरवल्या आहेत.

बुधवारी मतमोजणी कर्तव्यात गुंतलेल्या कर्मचाºयांचे दुसरे प्रशिक्षण आहे. हे यंत्र नेहमी प्रशिक्षणासाठी वापरले जाते. निवडणुकीत कोणत्या ईव्हीएमचा वापर करण्यात आला. ते सर्व सुरक्षित खालीमध्ये सीआरपीएफच्या ताब्यात आहेत. तेथे सीसीटीव्हीची नजर आहे. सर्व राजकीय पक्षांचे लोक तिथे आहेत.

Allegations against EVM mean defeat by Akhilesh Yadav

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात