विशेष प्रतिनिधी
मुंबई : “वर्षा”वर शिंदे + फडणवीसांची शिष्टाई; विजय शिवतारे – अजितदादांना दिलजमाई!!, दोन दिवसांपूर्वी अजित पवारांवर टीकास्त्र सोडणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे आता बॅकफूटवर गेले. विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद मिटला असून त्यांच्यात मनोमिलन झाले. काल (बुधवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या “वर्षा” या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विजय शिवतारेंची विशेष बैठक झाली. Dispute Bewteen Vijay Shivtare And Ajit Pawar Resolved After Meeting At Varsha Bunglow
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात मध्यस्थी केली. त्यामुळे विजय शिवतारेंचे बंड शमले. या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन शिवतारे आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडणार आहेत. त्यामुळे बारामती मतदारसंघातील वाद शमल्याची चिन्ह आहेत. या बैठकीत शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले हे देखील उपस्थित होते.
काय होता वाद ?
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून हा वाद सुरू झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सज्ज झाल्या, तर महायुतीत सामील झालेल्या अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाली होती. मात्र, महायुतीतील आणखी एक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हेदेखील बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर ठाम होते.
राज्यातील जनतेला नवीन पर्याय हवे आहेत. पवार पर्व संपण्यासाठी मी लढत आहे. जनतेला दुसरा पर्याय हवा, असे म्हणत त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार शरसंधान साधले होते. विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावरही बोचरी टीका केली होती. त्यामुळे बारामतीच्या जागेचा पेच वाढला होता.
मात्र काल “वर्षा” वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सोबत शिवतारेंची बैठक झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवतारे आणि अजित पवार यांच्यात समेट घडवून आणला. फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर विजय शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ते आता बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चाही सुरू आहे. याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन शिवतारे हे त्यांची भूमिका स्पष्ट करतील. ते काय बोलतात, काय निर्णय जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App