वृत्तसंस्था
कोलकाता : बुधवारी कोलकाता विमानतळावरील धावपट्टीवर उभ्या असलेल्या एअर इंडियाच्या विमानाला इंडिगोचे विमान धडकले. या धडकेत दोन्ही विमानांचे नुकसान झाले आहे. एअर इंडियाच्या विमानाच्या पंखाचा काही भाग तुटून पडला.IndiGo plane hits Air India, part of wing breaks off; Incident at Kolkata Airport
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, इंडिगोचे पायलट आणि को-पायलट दोघांनाही ऑफ ड्युटी करण्यात आली.
एअर इंडियाचे विमान चेन्नईसाठी उड्डाण करणार होते
डीजीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना इंडिगोच्या A320 VT-ISS फ्लाइट आणि एअर इंडिया एक्स्प्रेस 737 VT-TGG दरम्यान घडली.
एअर इंडियाचे विमान चेन्नईसाठी उड्डाण करणार होते आणि धावपट्टीवर पोहोचण्याची वाट पाहत होते. त्यानंतर इंडिगोचे विमान धावपट्टीवरून आले आणि एअर इंडियाच्या विमानाला धडकले. त्यामुळे पंखाचे नुकसान झाले.
“आम्ही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत आणि इंडिगो एअरलाइन्सचे दोन्ही पायलट ऑफ-रोस्टर करण्यात आले आहेत,” असे अधिकाऱ्याने सांगितले. तपासादरम्यान ग्राउंड स्टाफचीही चौकशी केली जाणार आहे. तपासासाठी दोन्ही उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App