नाशिक : राज्याच्या फडणवीस मंत्रिमंडळातले मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मालेगाव मधले नेते दादा भुसे यांना राष्ट्रवादीच्या संस्कारांचे लागण झाल्याची चिन्हे दिसली. एकनाथ शिंदेंच्या पेक्षा दादा भुसे यांनाच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची तहान लागली.Dada Bhuse is infected with the NCP’s traditions; Dada is more thirsty for the Chief Minister’s post than Eknath Shinde!!
एकीकडे शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भाजप आमचा पक्ष फोडतोय म्हणून टाहो फोडत असताना दुसरीकडे दादा भुसेंना एकनाथ शिंदे भाजपच्या बळावर मुख्यमंत्री होणार असल्याचा भास व्हायला लागलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने स्वतःच्या राजकीय कर्तृत्वापेक्षा इतरांच्या टेकूवरच मुख्यमंत्री पदाची तहान लागलेले अनेक नेते आजही विद्यमान आहेत आणि त्यांचे समर्थक त्यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांची पोस्टर्स भावी मुख्यमंत्री म्हणून झळकवत असतात. अजित पवारांपासून जयंत पाटलांपर्यंत आणि सुप्रिया सुळे यांच्यापासून ते रोहित पवारांपर्यंत सगळेच भावी मुख्यमंत्री पोस्टरवरच्या खुर्चीवर बसतात, पण प्रत्यक्षात राजकीय कर्तृत्वाअभावी त्यांना कुणालाच कधी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसता आले नाही. किंवा शरद पवारांना सुद्धा आपल्या मनातला मुख्यमंत्री करता आला नाही, पण म्हणून पोस्टर वरच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जाऊन बसायची राष्ट्रवादीच्या नेत्यांची तहान काही भागत नाही.
– जनतेच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नेमकी तशीच अवस्था दादा भुसेंची झाली की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती त्यांच्याच भाषणामुळे आली. नंदुरबार मध्ये ते प्रचारासाठी आले असताना त्यांनी एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पदाची वकालत केली. आजही तुम्ही कुणालाही विचारा जनतेच्या मनात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत, असे दादा भुसे म्हणाले. त्या पलीकडे जाऊन त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचे मोठे भाकीतही केले. लवकरच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातली इच्छा पूर्ण होईल एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे नेतृत्व करताना दिसतील. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून अगदी झोपडपट्टीतून आलेल्या माणसाला सुद्धा एकनाथ शिंदे भेटत होते. अजित पवारांनी सुद्धा त्यांची स्तुती केली. एवढ्या सगळ्या फाईल्सवर सह्या करणारा मुख्यमंत्री मी पाहिला नव्हता, असे अजित पवार म्हणाले होते, याची आठवण दादा भुसे यांनी करून दिली.
– राजकीय सत्य
पण याच अजित पवारांची स्वतःचीच मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा बाळगली. अनेकदा ती जाहीरपणे बोलून दाखवली, पण अजूनही ती पूर्ण झाली नाही हे मात्र दादा भुसे विसरले. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे मोठेपण सांगण्यासाठी अजित दादांच्या वक्तव्याची साक्ष काढली. पण दादा भुसे यांच्या एकूण वक्तव्यातून एकनाथ शिंदे यांच्या पेक्षा त्यांनाच शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाची तहान लागली हे राजकीय सत्य मात्र दिसून आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App