वृत्तसंस्था
मुंबई – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी आवश्यक असलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) डिसेंबरमध्ये आहे. यासाठी सीबीएसईने वेळापत्रक जाहीर केले.CET will be held in Dec.
१६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या दरम्यान परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. देशभरातील एकूण २० भाषांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. तर यंदा ही परीक्षा कॉम्प्युटर बेस म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
परीक्षार्थींना २० सप्टेंबरपासून सीटीईटीसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्याची मुदत १९ ऑक्टोबर रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत आहे. http://ctet.nic.in या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी अर्ज भरू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App