कारवाई करताना मोठा फौजफाटा तैनात
विशेष प्रतिनिधी
नागपूर : Bulldozer औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत नागपूरमध्ये झालेल्या निदर्शनानंतर अचानक हिंसाचार उफाळला होता. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने आता हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानवर कारवाई केली आहे. फहीम खानच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. फहीम खानवर नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.Bulldozer
महाराष्ट्रातील नागपूर शहरात १७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १०० हून अधिक लोकांमध्ये मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) नेते फहीम खानचा समावेश आहे. सूत्रांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी नागपूर महानगरपालिकेने फहीम खानला नोटीस बजावली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोधरा नगर परिसरातील संजय बाग कॉलनीतील हे घर फहीम खानच्या पत्नीच्या नावावर नोंदणीकृत आहे. एमडीपी शहर प्रमुख फहीम खान सध्या तुरुंगात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेने केलेल्या निदर्शनानंतर काही समाज कंटांमुळे अचानक हिंसाचार उफाळला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App