”जरा डोळे उघडा आणि नीट पहा…” असंही भाजपाने म्हटलं आहे.
.विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील स्वच्छतेच्या समस्येवरून बीएमसीवर टीका केली. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. ज्यावर आता भाजपाकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. BJP hit back at Aditya Thackeray You only spread false gossip about the environment
भाजपाने म्हटलं आहे की, ”आदित्य ठाकरे स्वच्छतेच्या क्रमवारीत मुंबई 31 व्या क्रमांकावर आली म्हणून नाकं मुरडत भाजपावर निर्लज्जपणे खापर फोडत आहात, पण जरा लाज वाटू द्या.. तुमच्या हातात सत्ता असताना तर ४९ व्या क्रमांकावर मुंबई होती. दुर्देवानं २ दशकांपेक्षा जास्तकाळ मुंबईची सत्ता उध्दव ठाकरेंच्या हातात होती. मात्र आशियातल्या महानगरपालिकांपेक्षा सर्वात जास्त बजेट असलेलं शहर म्हणजे ‘आपली मुंबई’ची त्यांनी तुंबई केली.”
याशिवाय, ”मिठी नदी असो की समुद्र त्यात तुम्ही खुशाल गटारीचं आणि घाणीचं पाणी सोडलंत. मात्र मुंबईत इतक्यावर्षात साधा सिव्हरेज प्लांट तुम्हाला उभारता आला नाही. भाजपाच्या सत्तेत केंद्र आणि राज्य सरकारकडून आता सिव्हरेज प्लांट उभे केले जात आहेत. तुम्ही मात्र इतकी वर्ष पर्यावरणाचे खोटे गोडवे गात जनतेची फसवणूक केली. कोट्यावधी रुपये मुंबईच्या सौदर्यकरणावर खर्च केले ते सौदर्य नेमकं गेलं कुठे? जरा डोळे उघडा आणि नीट पहा अलीकडे विकसित झालेली नवी मुंबई जिथे भाजपची सत्ता आहे ती स्वच्छतेबाबत देशात तिसर्या क्रमांकावर आहे. तुम्हाला याच्याशी काही घेणंदेणंच नाही म्हणा.. तुम्ही फक्त पर्यावरणावर खोट्या गप्पा हाणा.” अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरेंवर भाजपाने पलटवार केला आहे.
”मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित”
आदित्य ठाकरे काय म्हणाले होते? –
”गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील स्वच्छतेच्या भीषण होत चाललेल्या अवस्थेबद्दल बीएमसीला पत्र लिहिले. सध्या मुंबईकरांच्या तक्रारी बीएमसी ऐकत नाहीये. कारण नेमलेले प्रशासक लोकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून बिल्डर आणि कंत्राटदारांना खूश करण्यात व्यस्त आहेत.” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App