या भीषण स्फोटांमध्ये १०० पेक्षा अधिकजण जखमी देखील झाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये शुक्रवारी (29 सप्टेंबर) एकापाठोपाठ एक झालेल्या दोन आत्मघाती बॉम्बस्फोटांमध्ये किमान ६० जण ठार तर १०२जण जखमी झाले. पहिला स्फोट पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील मस्तुंग भागात झाला, ज्यामध्ये ५२ लोक ठार आणि डझनभर जखमी झाले. त्याचवेळी खैबर पख्तुनख्वा प्रांतातील हंगू मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी दुसरा स्फोट झाला. 60 killed 102 injured in two bomb blasts in Pakistan
रिपोर्टनुसार, स्फोटाच्या वेळी मशिदीत ३० ते ४० जण उपस्थित होते. हंगूचे जिल्हा पोलीस अधिकारी निसार अहमद यांनी मृत आणि जखमींबाबत दुजोरा दिला आहे. मशिदीत शुक्रवारची नमाज न होत असताना हा स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले.
”तुम्ही फक्त पर्यावरणावर खोट्या गप्पा हाणा” भाजपाने आदित्य ठाकरेंवर केला पलटवार!
एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्फोटामुळे मशिदीचे छत कोसळले असून ढिगाऱ्याखाली सुमारे ३० ते ४० लोक अडकले असण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्यातून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App