मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला फ्लॅट नाकारण्यात आल्याच्या घटनेवरून राज ठाकरेंचा कडक इशारा
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील मुलुंड परिसरातील एका सोसायटीमध्येकाल फ्लॅटसाठी चौकशी करण्यास गेलेल्या तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला अत्यंत वाईट अनुभव आला. केवळ मराठी असल्याने त्यांना त्या ठिकाणी फ्लॅट नाकारला गेला. एवढच नाहीतर त्यांना व त्यांच्या पतीला धक्काबुक्की देखील झाली. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये त्यांनी शूट केला व तो सोशल मीडियावर प्रसारित करून, घडलेली संतापजनक घटना जगासमोर आणली आणि आपली व्यथा मांडली. MNS President Raj Thackerays reaction to the incident of Marathi woman in Mulund
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वचस्तरातून प्रचंड संताप व्यक्त केला गेला. एवढच नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित सोसायटीत जाऊन, मराठी माणसाला फ्लॅट देत नाही असे सांगणाऱ्या पिता-पुत्राला चांगलीच समज दिली. यानंतर त्यांना जाहीर माफी देखील मागायला लावली. दरम्यान या दोघांविरोधात मुलुंड पोलिसात रात्री गुन्हा देखील दाखल झाला व त्यांना अटक करण्यात आली होती. या घटनेवर कालापासून सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेते मंडळींकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या घटनेवर आपल्या स्टाइलने कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे म्हणतात, ”मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.”
“…हीच स्वामिनाथन यांना खरी श्रद्धांजली ठरेल” राज ठाकरे यांचं विधान!
याशिवाय ”मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे !”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App