मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील तरुणांना मार्गदर्शन केले
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील हजारो तरुणांना सरकारी नोकऱ्यांची भेट दिली. 9व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील ५१ हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्ती पत्रे दिली. यानंतर पंतप्रधान मोदींनी नियुक्ती पत्र मिळालेल्या तरुणांनाही संबोधित केले. यासोबतच त्यांनी युवकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. Prime Minister Modi distributed appointment letters to 51 thousand youth
यावेळी पीएम मोदी म्हणाले, “आजच्या रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रे मिळालेल्या सर्व उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही सर्वांनी कठोर परिश्रमाने हे यश मिळवले आहे. या यशाचा तुमच्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल. देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या शुभ मुहूर्तावर तुम्हा सर्वांच्या नव्या आयुष्याचा शुभारंभ होत आहे.
PM गतिशक्ती योजनेच्या नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपची 56 वी बैठक, 52000 कोटी रुपयांच्या सहा प्रकल्पांची शिफारस
मंगळवारी 9व्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत देशभरात ४६ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि तेथून ५१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App