ठाकरे – आंबेडकरांच्या तोंडी एकच भाषा; देश पेटण्याचा (की पेटविण्याचा) देताहेत इशारा!!


प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे – आंबेडकरांच्या तोंडी एकच भाषा; देश पेटण्याचा किंवा पेटविण्याचा देताहेत इशारा!!, असं खरंच घडलं आहे. Uddhav thackeray and prakash ambedkar used same language of riots in the country

आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंच्या सामनातून संजय राऊत नेहमीच देशात अराजक माजण्याचा इशारा देत आले आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप देशात दंगली घडवेल. मोदी – शाहांना काहीही करून निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यांना देशातल्या सामान्य जनतेशी काही देणे घेणे नाही, अशी भाषा सामनाच्या वेगवेगळ्या अग्रलेखांमधून समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेमकी तीच भाषा वापरून देशात दिवाळीनंतर गोध्रा, मणिपूर सारख्या दंगली होतील. दिवाळीनंतर देशात कत्तल की रात असेल, अशी भाषा वापरली आहे. ठाकरे आणि आंबेडकरांच्या भाषेतल्या साम्यामुळे दाट संशय तयार झाला आहे.उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्राची युती झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुका शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढण्याची शक्यता आहे, पण प्रकाश आंबेडकर यांना अद्याप काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडीत तसेच “इंडिया” आघाडीत स्थान दिलेले नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर देखील चिडचिड केली.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आंबेडकरांनी एक पत्र पाठविले आहे, पण त्या पत्राचे अद्याप खर्गे यांनी उत्तरही दिलेले नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस दोन हात लांबच ठेवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हे एकच भाषा वापरत असल्याने त्याविषयी दाट संशय निर्माण झाला आहे. दोघांना भाजप विरुद्ध लढायचे आहे आणि ती लढाई लढताना ते स्वतःचा विशिष्ट नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी देशात दंगली घडतील, असा इशारा दोघे एकाच भाषेत देत आहेत.

Uddhav thackeray and prakash ambedkar used same language of riots in the country

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात