जबलपूरमधील धर्मशास्त्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने विद्यार्थीनींसाठी मासिक पाळी रजा धोरण केले लागू


DNLU ने विद्यार्थीनींसाठी  स्टुडंट बार असोसिएशनच्या विनंतीवरून “विशेष व्यवस्था” करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: मध्यप्रदेशच्या जबलपूरमधील  धर्मशास्त्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने विद्यार्थीनींसाठी मासिक पाळी रजा धोरण लागू केले आहे.  सोशल मीडियावर लाइव्ह लॉने शेअर केलेल्या नोटीसनुसार. DNLU ने विद्यार्थीनींसाठी  स्टुडंट बार असोसिएशनच्या विनंतीवरून “विशेष व्यवस्था” करण्याचा निर्णय घेतला आहे. Dharmashastra National Law University Jabalpur has implemented menstrual leave policy for female students

हे धोरण पूर्णवेळ असणाऱ्या  विद्यार्थीनींसाठी लागू असणार आहे. विधी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण डीन प्रवीण त्रिपाठी म्हणाले, मासिक पाळीमुळे वर्गात उपस्थित राहता न आल्याने  झालेले शैक्षणिक नुकसान विद्यार्थीनी भरून काढू शकतील आणि या काळातील रजा मंजूर  केल्या जातील.

पंकजा मुंडेंनाही मुंबईत घर घेताना आला होता कटू अनुभव, जाणून घ्या नेमकं काय सांगितलं…

“प्रशासकीय मान्यतेने, महिला विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्याच्या विद्यापीठाच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आणि स्टुडंट बार असोसिएशनच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या विनंतीवर आधारित, याद्वारे सूचित केले जाते की पूर्णवेळ विद्यार्थिनी मासिक पाळीमुळे होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी विद्यापीठकडून व्यवस्था केली जाईल. ” त्रिपाठी यांनी अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे.

 

यासाठी वाढीव दिवसांच्या कालावधीत विद्यापीठाचे नियम सारखेच राहणार आहेत. शिवाय त्रिपाठी यांनी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना यासाठी पाठिंबा मागत, अशी विनंतीही केली की  जेव्हा एखादी विद्यार्थीनी असा विशेष अर्ज सादर करेल तेव्हा सर्वांनी वरील बाबी लक्षात घ्याव्यात.

Dharmashastra National Law University Jabalpur has implemented menstrual leave policy for female students

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात