छोटा मासा – मोठा मासा; अंडी – कोंबडी, दाढी – मिशा!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : छोटा मासा – मोठा मासा; अंडी – कोंबडी, दाढी मिशा!!, हे शीर्षक सहज सुचले म्हणून दिलेले नाही तर यातील प्रत्येक शब्द आज महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी आपल्या विरोधकांवर टीका करताना वापरलेला आहे. BJP, Congress and NCP leaders targets each other with verbal punches

राज्याचे मंत्री विजयकुमार गावित यांच्या मुलीला 10 कोटी रुपयांचे शेतीविषयक अनुदान मिळाल्याची बातमी समोर आल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विजयकुमार गावित यांना छोटा मासा म्हटले. विजयकुमार गावित हे छोटा मासा आहेत. सत्तेच्या माध्यमातून अनुदान आणि पैसा लाटणारे असे अनेक बडे मासे भाजपमध्ये आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला. नानांच्या या वक्तव्यावर विजयकुमार गावित यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांवर टीका करताना ते अजून अंड्यात आहेत. ते ज्युनिअर केजी मध्ये आहेत. त्यांना अजून दाढी मिशा फुटायच्या आहेत. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे त्यांच्या विषयी काय म्हणाल्या होत्या, याचा त्यांनी विचार करावा, असे शरसंधान साधले होते. रोहित पवार प्रत्येक सामाजिक विषयावर टीका टिप्पणी करत असतात. याच मुद्द्यावर नितेश राणे यांनी त्यांचा समाचार घेताना वर उल्लेख केलेली टीका नागपूरातून केली.नितेश राणेंना उत्तर देताना रोहित पवारांनी राणे कुटुंबीयांना अंडी आणि कोंबड्यांविषयी एवढे प्रेम का आहे हे माहीत नाही. पण मी पुरेसा मोठा आहे आणि मला जिथे पाहिजेत, तिथे केस आले आहेत, असे सडेतोड प्रत्युत्तर दिले.

महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असताना आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पाहताच मांजराचा म्याऊं म्याऊं असा आवाज काढला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मांजर, कुत्रं कोंबडी हे शब्द खूप गाजले होते. बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख वाघ असा करताना बहुतांश नेत्यांनी एकमेकांना मांजर, कुत्रं, कोंबडा, कोंबडी अशा शेलक्या उल्लेखांनी संबोधले होते.

त्याचीच पुनरावृत्ती काल आणि आज होऊन छोटा मासा – मोठा मासा, अंडी – कोंबडी, दाढी – मिशा या शब्दांमधून झाली.

BJP, Congress and NCP leaders targets each other with verbal punches

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!