भाजपा प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, ”तुमच्या नेत्यात…”
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इंडिया आघाडीने देशभरातील 14 पत्रकारांच्या शोवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ”मीडिया किंवा इतर कोणत्याही संस्थेपासून दूर राहून काँग्रेसला फायदा होणार नाही, पक्षाला फायदा हवा असेल तर राहुल गांधींवर बहिष्कार टाका, कारण त्यांच्यात ताकद उरलेली नाही.” असा टोला भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकारपरिषदेतून लगावला आहे. Boycott not journalists but Rahul Gandhi BJP advice to Congress
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतात अशी एकही संस्था नाही जिच्यावर या विरोधी आघाडीने टीका केली नाही, मग निवडणूक आयोग असो की न्यायालये. परंतु काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी ज्याच्यावर बहिष्कार टाकायला पाहिजे ते म्हणजे राहुल गांधी आहेत, त्यांच्यात ताकद नाही. तुम्ही कोणावर बहिष्कार घालणार? जर तुम्हाला बहिष्कार घालायचा असेल तर पुढे व्हा आणि तुमच्या नेत्यावर बहिष्कार टाका. काँग्रेस नेते प्रेमाबाबत बोलतात परंतु द्वेष पसरवतात, असा दावा पात्रा यांनी केला.
विरोधी पक्षांच्या ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) ने गुरुवारी निर्णय घेतला की ते देशातील १४ टेलिव्हिजन अँकरच्या कार्यक्रमांना त्यांचे प्रतिनिधी पाठवणार नाहीत. तर न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशन (NDBDA) ने सांगितले की बहिष्काराचा हा निर्णय एक धोकादायक उदाहरण सिद्ध होईल. हे लोकशाहीच्या मूल्यांच्या विरोधात आहे. त्याचवेळी भाजपाने विरोधी आघाडीच्या या निर्णयाची तुलना इंदिरा गांधी सरकारच्या काळात लादलेल्या आणीबाणीशी केली आहे.
विरोधी पक्ष आघाडी ‘इंडिया’च्या मीडिया संबंधित समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विरोधी आघाडीच्या मीडिया कमिटीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘इंडिया’ समन्वय समितीच्या 13 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, विरोधी आघाडीचे पक्ष त्यांचे प्रतिनिधी या १४ अँकरच्या शो किंवा कार्यक्रमांना पाठवणार नाहीत. ”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App