वृत्तसंस्था
मुंबई : भोसरी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या झोटिंग समितीनं राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर ठपका ठेवला आहे. Bhosari MIDC Land Scam case ; Eknath khadse is in the list of Zoting Committee Report
पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांना भोसरीतील भूखंड विकत घेता यावा, यासाठी खडसे यांनी पदाचा गैरवापर केला, असा अहवाल झोटिंग समितीनं तात्कालीन सरकारला सादर केला होता, अशी माहिती आता समोर येते आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं वृत्त दिल आहे.
झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याचं वृत्त काल एबीपी माझानं दाखवलं होते. त्यानंतर मंत्रालयातल्या यंत्रणा कामाला लागल्या आणि झोटिंग समितीचा अहवाल पुन्हा प्राप्त झाल्याचं कळत आहे. दरम्यान, भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी सध्या खडसे, त्यांच्या पत्नी आणि जावयाच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. अशातच झोटिंग समितीचा अहवाल समोर आल्यानं खडसेंच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App