शरद पवारांना राष्ट्रपती बनविण्यासाठी प्रशांत किशोरांकडून विरोधकांची जमवाजमव, राहुल गांधींशी बैठकीनंतर चर्चांनी धरला जोर

Prashant Kishor meet Rahul Gandhi For Sharad pawar president candidate

Sharad pawar president candidate : कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असतानाच देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुढच्या वर्षी अनेक राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसोबतच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका आणि 2024च्या लोकसभा निवडणुकांविषयीही घडामोडींनी वेग घेतला आहे. मंगळवारी झालेली निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी भेट ही त्यातला महत्त्वाचा भाग आहे. Prashant Kishor meet Rahul Gandhi For Sharad pawar president candidate


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असतानाच देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुढच्या वर्षी अनेक राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसोबतच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका आणि 2024च्या लोकसभा निवडणुकांविषयीही घडामोडींनी वेग घेतला आहे. मंगळवारी झालेली निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी भेट ही त्यातला महत्त्वाचा भाग आहे.

प्रशांत किशोर संपूर्ण विरोधी पक्षांना एकत्र करण्यात गुंतल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुढचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांनंतर प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना तीन वेळा भेट दिलेली आहे.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ सन 2022 मध्येच पूर्ण होईल, अशा परिस्थितीत देश नव्या राष्ट्रपतींच्या शोधात असेल.

नवीन पटनायक साथ देणार का?

प्रशांत किशोर यांच्या हिशेबानुसार जर विरोधी पक्ष एकत्र झाले तर इलेक्टोरल कॉलेजच्या बाबतीत सरकारसमोर ताकद वाढेल. तसेच बीजदचे नवीन पटनायक विरोधी पक्षांसह आले, तर हा मार्ग सुकर होईल. कारण यावेळी महाराष्ट्र आणि तमिळनाडूसारख्या बड्या राज्यांत विरोधी पक्षांचे सरकार आहे, येथून बरेच आकडे मिळण्याची आशा आहे. ओडिशा हा एकमेव ग्रे एरिया आहे जेथील नवीन पटनायक पूर्णपणे विरोधांच्या कंपूत नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रशांत किशोर यांनी नवीन पटनायक, एमके स्टालिन यांनाही याच विषयावर भेट दिली आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

प्रशांत किशोर यांचे कॉंग्रेसला सादरीकरण

आता प्रशांत किशोर यांची राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी मंगळवारी झालेली भेट विरोधकांमध्ये रखडलेला संवाद सुरू करण्याचा दुवा म्हणून पाहिले जात आहे. राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांची ही बैठक दोन तासांहून अधिक काळ चालली. विरोधकांनी एकत्र आल्यास भाजपचे मनसुबे उधळण्याची शक्यता असल्याचा विश्वास प्रशांत किशोर यांना वाटतो. त्यामुळे 2024च्या निवडणुकीपूर्वी त्याचा फायदा होईल.

ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, अरविंद केजरीवाल, एमके स्टालिन, उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांशी प्रशांत किशोर यांचे चांगले संबंध आहेत हे सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत त्यांना एकत्र आणणे फार अवघड नसले, तरी कॉंग्रेसला सोबत आणणेही आवश्यक आहे.

मंगळवारी झालेल्या बैठकीत राहुल गांधी, प्रियंका गांधी होते आणि अशी चर्चा आहे की या बैठकीत सोनिया गांधी यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला होता. प्रशांत किशोर यांच्या वतीने कॉंग्रेस नेतृत्वाला एक सादरीकरण देण्यात आले होते, ज्यात कॉंग्रेसला विविध राज्यांतील परिस्थितीविषयी स्पष्टीकरण देण्यात आले होते. आता प्रशांत किशोर यांची ही योजना यशस्वी होते का, शरद पवारांना राष्ट्रपती होता येईल का, हे नजीकच्या काळात दिसून येणार आहे.

Prashant Kishor meet Rahul Gandhi For Sharad pawar president candidate

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण