शहरी नक्षलीचा आरोप असलेल्या फादर स्टेन स्वामींना नोबेल द्यावा; सुपर कॉप ज्युलियो रिबेरोंची मागणी

Julio Ribero Demands Nobel Peace Prize For Late Fr Stan Swamy, says His death Was State Sponsored

Julio Ribero : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी फादर स्टेन स्वामी यांचा नुकतेच रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलियो रिबेरो यांनी फादर स्टेन स्वामींचा मृत्यू हा राज्य प्रायोजित असल्याची टीका केली आहे. अशिक्षित लोकांकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही ते म्हणाले. एवढेच नाही, तर ज्युलियो रिबेरो यांनी फादर स्टेन स्वामींना मरणोपरान्त नोबेल शांती पुरस्कार मिळण्यासाठी लोकांना त्यांच्या ऑनलाइन आवाहनाला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. रिबेरो यांच्या मते, फादर स्टेन स्वामीच खरोखर नोबेल शांती पुरस्कारासाठी पात्र आहेत. Julio Ribero Demands Nobel Peace Prize For Late Fr Stan Swamy, says His death Was State Sponsored


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी फादर स्टेन स्वामी यांचा नुकतेच रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलियो रिबेरो यांनी फादर स्टेन स्वामींचा मृत्यू हा राज्य प्रायोजित असल्याची टीका केली आहे. अशिक्षित लोकांकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही ते म्हणाले. एवढेच नाही, तर ज्युलियो रिबेरो यांनी फादर स्टेन स्वामींना मरणोपरान्त नोबेल शांती पुरस्कार मिळण्यासाठी लोकांना त्यांच्या ऑनलाइन आवाहनाला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. रिबेरो यांच्या मते, फादर स्टेन स्वामीच खरोखर नोबेल शांती पुरस्कारासाठी पात्र आहेत.

माजी पोलीस आयुक्त ज्युलियो रिबेरो यांनी ट्रिब्यून इंडियामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात म्हटले की, जर नोबेल पुरस्कार भारताच्या या शहीद जेसुइट पुजाऱ्याला दिला गेला, तर तो आदिवासी लोकांचा एक प्रतिनिधी, ज्यांच्या अधिकारांसाठी त्यांनी आपल्या छोट्याशा जीवनकाळात संघर्ष केला, त्यांचा सन्मान ठरेल.

रिबेरो पुढे म्हणाले की, एका असंवेदनशील राज्याद्वारे त्यांच्याविरुद्ध आरोप करण्यात आला होता की, ते झारखंडच्या जंगलांमध्ये सक्रिय असलेल्या प्रतिबंधित माओवादी संघटनेसोबत काम करत होते. आरोप करणारे अशिक्षित असल्याचे स्पष्ट होते. जेसुइट पुजारी आणि मार्क्सवादी दोन्ही गरिबांसाठी आणि वंचितांसाठी काम करतात, परंतु एकदम विरुद्ध पद्धतीने. त्या मूळ तथ्याला समजण्यासाठी एखाद्याला येशूच्या शिकवणीचा वास्तविक सार समजून घ्यावा लागेल.

रिबेरोंनी आरोप केला की, त्यांना जाणूनबुजून फसवण्यात आले होते. पहिल्यांदा जेव्हा स्टेन स्वामींच्या कॉम्प्युटरमधून तो पुरावा दाखवण्यात आला, तेव्हा फादरनी तो स्पष्टपणे नाकारला होता, त्यांना पुरेपूर कल्पना आली होती की, त्यांना अडकवले जात आहे. इतर सहआरोपींनी विशेषत्वाने विल्सन, गाडलिंग आणि उषा भारद्वाज यांनीही म्हटलं होतं की, त्यांना अडकवले जात आहे.

दरम्यान, रिबेरो यांच्या या लेखावर आता विविध प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. यापूर्वीही अनेकांनी फादर स्टेन स्वामींचा राज्य सरकारडून खून झाल्याचा आरोप केला होता.

Julio Ribero Demands Nobel Peace Prize For Late Fr Stan Swamy, says His death Was State Sponsored

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण