Batenge To katege : हिंदूंच्या एकजुटीचा घेतला धसका; “बटेंगे तो कटेंगे” घोषणेवर सुप्रिया सुळे + नवाब मलिकांची टीका!!

Batenge to katege

विशेष प्रतिनिधी

मुंबई : हिंदूंच्या एकजुटीचा घेतला धसका; म्हणून “बटेंगे तो कटेंगे” घोषणेवर सुप्रिया सुळे आणि नवाब मालिकांनी केली टीका!! Batenge to katege on  Commentary by Supriya Sule and Nawab Malik

लोकसभा निवडणुकीत व्होट जिहादचा अनुभव येताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हरियाणा आणि महाराष्ट्र या विधानसभा निवडणुकांमध्ये “बटेंगे तो कटेंगे” ही घोषणा दिली. त्यातून हिंदूंची एकजूट तयार व्हायला लागली. याचीच भीती सुप्रिया सुळे आणि नवाब मलिक यांना वाटल्याने त्यांनी त्या घोषणेवर टीका केली.

मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतदानातून केलेल्या व्होट जिहादचा महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला. परंतु आता हिंदूंची एकजूट झाली, तर व्होट जिहाद देखील उपयोगाचा ठरणार नाही, याची जाणीव सुप्रिया सुळेंना झाली. त्यामुळेच त्यांनी “बटेंगे तो कटेंगे” घोषणेवर टीका केली. महाराष्ट्रात सगळेच एकजुटीने राहतात. त्यामुळे इथे योगींचे राजकारण चालणार नाही, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.

 

सुप्रिया सुळे यांच्या सुरात नवाब मलिक यांनी सूर मिसळला. वास्तविक नवाब मलिक अजितदादा बरोबर भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसले, पण भाजपने त्यांना निवडणूक लढवायला विरोध करताच त्यांनी भाजप विरोधातला फणा काढला. अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणूक जरी महायुतीतून लढत असली, तरी निवडणुकीनंतर काहीही वेगळे होऊ शकते, असा दावा नवाब मलिक यांनी केला. त्याचवेळी त्यांनी “बटेंगे तो कटेंगे” या गोष्टीला विरोध केला. उत्तर प्रदेशात त्या घोषणेचा भाजपला फटका बसला. महाराष्ट्रात देखील त्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “एक आहे तो सेफ है” घोषणा दिली, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

आज सुप्रिया सुळे आणि नवाब मलिक वेगवेगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, पण त्यांचा डीएनए एकच हिंदू विरोधाचा आहे. त्यामुळेच “बटेंगे तो कटेंगे” या घोषणातून हिंदू एक झाला, तर तो त्यांना नको आहे म्हणूनच त्यांनी त्या घोषणेला एका सूरात विरोध करून आपले हिंदू विरोधी धोरणच दाखवून दिले आहे.

Batenge to katege on  Commentary by Supriya Sule and Nawab Malik

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात