नाशिक : भाजपच्या शिर्डीतल्या महाअधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर एकाच वाक्यात टीका केली, तर ती त्यांच्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांना चांगलीच झोंबली. अमित शाहांनी शरद पवारांच्या 1978 पासूनच्या राजकारणाचे एका शब्दात वाभाडे काढले, तो म्हणजे “दगाफटका”. पण हा शब्द पवारांच्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांना झोंबला. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांच्यावर टीका करताना त्यांनी बीड आणि परभणी या विषयावर बोलावे, पण ते हेडलाईन मिळवण्यासाठी शरद पवारांवर टीका कर्ते झाले, असा आरोप केला.
सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांवर टीका करताना त्यांनी बीड आणि परभणी या विषयावर बोलावे, असे जरी म्हटले असले तरी प्रत्यक्षात अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री पदावर राहून फक्त त्या दोन प्रकरणांविषयी नुसते काही “बोलतील” की त्या पलीकडे जाऊन काही कृती करतील??, हा खरा सवाल आहे आणि तशी कृती अमित शाह यांनी केली, तर ती सुप्रिया सुळे यांच्या पक्षातल्या नेत्यांना किंवा त्यांच्या पिताश्रींनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीच्या नेत्यांना परवडेल का??, हा त्या पुढचा सवाल आहे.
कारण बीड प्रकरणांमध्ये जे सगळे आरोपी अडकले आहेत किंवा ज्यांच्यावर आरोप ठेवून सुप्रिया सुळे यांचा पक्ष राजीनामा मागत आहेत, ते धनंजय मुंडे किंवा वाल्मीक कराड आणि त्यांचे पित्ते हे सगळे खरे म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादी प्रवृत्तीचीच निर्मिती आहेत. “बारामतीचा विकास करा आणि बीडला भकास करा”, या ब्रीद वाक्याप्रमाणेच शरद पवारांची राष्ट्रवादी नावाची प्रवृत्ती वागल्याने बीडमध्ये गुंड प्रवृत्ती पोसली गेली आणि फोफावली. हे गेल्या एक – दोन वर्षात घडलेले नाही, तर अखंड राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असतानाचा 15 – 20 वर्षांचा हा कारनामा आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी शरद पवार आणि अजित पवार या दोघांची आहे, ती एकट्या अजित पवारांची नाही.
आज धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत म्हणून सुप्रिया सुळे नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांचा राजीनामा मागत आहेत, पण ते जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असते आणि बीडचे प्रकरण उघड्यावर आले असते, तर कोणत्या तोंडाने नैतिकतेचा मुद्दा सुप्रिया सुळे उपस्थित करू शकले असत्या??, हाही सवालच आहे.
पण ते काही असले तरी गृहमंत्री म्हणून अमित शाह यांनी बीड किंवा परभणी प्रकरणावर नुसते “बोलून” काही उपयोग नाही, तर कृती करायची गरज आहे आणि अमित शाह करणार म्हणजे ती कृती “ठोसच” असणार यात कुठली शंका असायचे कारण नाही.
– फडणवीसांचे अधिकाऱ्यांना “कठोर” फोन
पण त्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच एसआयटी आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना फोन करून कठोर भूमिका घ्या. कोणालाही सोडू नका. दयामाया दाखवू नका, असे स्पष्ट आदेश दिल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यात अर्थातच शरद पवारांनी निर्माण केलेल्या सगळ्या राष्ट्रवादीचे प्रवृत्तीच्याच लोकांचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App