“अपघातग्रस्तांची मांदियाळी” देशाच्या प्रमुखपदी बसली; आरोप – प्रत्यारोपांची राळ उडाली!!

BJP and Congress

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावावर ज्या अनेक गोष्टी खपवल्या गेल्या, त्यामध्ये ते “एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर” होते, ही गोष्ट देखील खपवली गेली होती. त्यावर केवळ पुस्तकच लिहिले गेले असे नाही, तर एक सिनेमा देखील आणून तो गाजवला गेला.

पण त्यामुळे भारताच्या राजकारणामध्ये एक नवीन संकल्पना तयार झाली, ती म्हणजे “एक्सीडेंटल प्रमुख” म्हणजेच “अपघातग्रस्त प्रमुख” या संकल्पनेचा उपयोग एखाद्या हत्यारासारखा राजकीय पक्षांनी केला ते “हत्यार” अजूनही वापरले जात आहे. याचा प्रत्यय नुकताच हरियाणात आला. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख करताना ते “एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर” होते. खरं म्हणजे पंतप्रधान पदावर सरदार वल्लभभाई पटेल यांचाच हक्क होता. परंतु, काँग्रेस मधले बहुमत डाऊन डावलून पंडित नेहरू पंतप्रधान पदावर जाऊन बसले, असा आरोप खट्टर यांनी केला. पंडित नेहरू यांच्या ऐवजी बाबासाहेब आंबेडकर किंवा सरदार पटेल यांनाच पंतप्रधान करायला हवे होते, असे मत खट्टर यांनी व्यक्त केले.

पंडित नेहरूंसारख्या काँग्रेसच्या टॉवरिंग पर्सनॅलिटीवर मनोहर लाल खट्टर यांनी तो आरोप केल्याबरोबर काँग्रेसचे नेते खवळले. त्यांनी मनोहर लाल खट्टर यांच्यावरच आरोपांची राळ उडवली. स्वतः मनोहर लाल खट्टर हेच हरियाणाचे “एक्सीडेंटल मुख्यमंत्री” होते. त्यामुळे त्यांना दुसरे कोणीही “एक्सीडेंटल” प्रमुखच वाटणार, असे शरसंधान माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुडा यांनी साधले.

पण या आरोप – प्रत्यारोपामुळे “अपघातग्रस्तांची मांदियाळी” देशाच्या प्रमुख पदावर बसली होती याचा “साक्षात्कार” देशातल्या जनतेला झाला.

BJP and Congress fight over accidental prime ministers

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात